बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (17:37 IST)

नशीब बलवत्तर ! कारखाली येऊन चिमुकली वाचली

दैव तरी त्याला कोण मारी असं म्हणतात असेच काही प्रत्यक्षात घडले आहे. रस्त्यावर दररोज कितीतरी अपघात घडतात. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ अंगाला थरकाप आणणारा आहे. या व्हिडीओ मध्ये एका चिमुकली वरून कार जाऊन देखील ती अपघातातून सुखरूप बचावली.

या चिमुकलीच्या अंगावरून काराचे चाक जाऊन ती सुखरूप बाहेर येते आणि उभी राहते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हिडीओ मध्ये दिसत आहे की रस्त्यावर ही चिमुकली सायकल चालवत आहे. वळणावर अचानक ती एका कारच्या समोर येते आणि कारचालकाला कारवरील नियंत्रण सुटते आणि ती मुलगी समोर आल्यावर तिच्या अंगावरून कार जाते नंतर कारचे मागचे चाक तिच्या अंगावरून जाते मात्र कारचे चाक तिच्या अंगावरून जाऊन देखील तिला कोणतीही दुखापत होत नाही आणि ती सुखरूप कारच्या खालून बाहेर पडते. मुलीचे नशीब बलवत्तर होते म्हणून तिला कोणतीही दुखापत झाली नाही. 
 
या घटनेचा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडिया वर शेअर केला आहे. कॅप्शन मध्ये त्यांनी 'जाको राखे साईया  मार सके न कोय' लिहिले आहे. 9 सेकंदाचा हा व्हिडीओ 10 हजार लोकांनी पहिला आहे.  
 
Edited By - Priya Dixit