रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2018
Written By
Last Updated : बुधवार, 19 डिसेंबर 2018 (13:43 IST)

इंस्टाग्रामवर मीटूला सर्वाधिक समर्थन

सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर 2018 मध्ये मीटू अभियानात सर्वाधिक समर्थन मिळालं. जगभरात 15 लाखाहून अधिक #metoo हा हॅशटॅग पोस्ट करण्यात आला.  #metoo पाठोपाठ दुसऱ्या क्रमांरावर #timesup हे अभियान राहिलं. या अभियानाला जवळपास 6 लाखवेळा पोस्ट करण्यात आलं. 
 
दुसरीकडे  वर्षभरात भारतीयांनी इंस्टाग्रामवर प्रेमाचे आणि आनंदाचे पोस्ट शेअर केले. हॅशटॅगच्या कॅटगिरीत भारतीयांनी #love या हॅशटॅगचा सर्वाधिक वापर केला. तसेच हार्टचं स्टिकर सर्वाधिक वेळा पोस्ट करण्यात आलं.  देशात सर्वाधिक जास्त युझर्सकडून विराट आणि अनुष्काची पोस्ट लाइक करण्यात आली. विराटच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या फोटोला 36 लाखाहून अधिक लाइट मिळाले. तसेच दुसरा फोटो देखील विरूष्काचा आहे. या फोटोला 28 लाख लाइक्स मिळाले आहे. फक्त हा फोटो अनुष्काच्या अकाऊंटवरून करण्यात आला. तिसरा लोकप्रिय फोटो हो धोनीचा राहिला आहे.