सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (16:40 IST)

पोलिस खात्यात metoo चे वादळ, महिलेचा आरोप; पोलिसाची आत्महत्या

#MeToo प्रकरणी अनेक दिग्गज अडकले आहेत. असाच धक्कादायक प्रकार पोलिस खात्यात घडला असून, त्यामुळे मोठा धक्का खात्याला बसला आहे. यात एका महीलेने परिचित असेलल्या पोलिस उपनिरीक्षक असलेल्या व्यक्तीने तिचे लैगिक शोषण केले अशी फिर्याद उपनगर पोलिस स्टेशन येथे दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता, हा गुन्हा ज्यांच्या विरोधात होता ते पोलिस निरीक्षक यांनी रेल्वे खाली येत आत्महत्या केली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. नेमके महीलेचे आरोप खरे की बदनामी होणार म्हणून पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली हे कोडे पोलिसांना उलगडावे लागणार आहे.me
 
सविस्तर वृत्त असे की,पीडित महिला या  नाशिक येथील रहिवाशी आहेत.  त्यांचे पती पोलीस खात्यात कार्यरत आहेत. ज्यांच्यावर आरोप केले व ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या दोघांच्या कुटूंबामध्ये परिचय होता. याचा फायदा संशयीत पोलीस उपनिरीक्षकाने घेतला असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. संशयित मृत पोलीस उपनिरीक्षकाने पीडित महिलेला मोबाईल क्लिप, फोन रेकॉर्डिंग व्हायरल करेल अशी धमकी देत अनेक वेळा त्यांचे लैंगिक शोषण केले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. अखेर पीडित महिलेने नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षकावर भादंवि ३७६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.