1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (11:15 IST)

ऑक्स्फर्डने ‘टॉक्सिक’ शब्द ‘वार्षिक शब्द’ ठरवला

प्रतिष्ठित ऑक्स्फर्ड शब्दकोशाने २०१८चा ‘वार्षिक शब्द’ म्हणून ‘टॉक्सिक’ या शब्दाची निवड केली आहे. जो शब्द त्या वर्षांतील समाजवास्तवाचे प्रतिनिधित्व करतो त्याची निवड दरवर्षी ऑक्स्फर्ड दरवर्षी ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून करते.
 
या वर्षी अनेक शहरांतले वातावरण प्रदूषणाने विषारी होते, राजकीय क्षेत्रही विषारी वक्तव्यांनी दूषित होते आणि ‘मीटू’सारख्या मोहिमेनेही विषारी पौरुषाचा प्रथमच उल्लेख केला. त्यामुळे हा शब्द या वर्षभरात विविध संदर्भात सातत्याने वापरात आल्याने त्याची निवड झाली.
 
‘गॅसलाइटनिंग’, ‘इन्सेल’, ‘टेकलॅश’ आणि ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी’ हे शब्द निवड समितीसमोर अंतिम फेरीत आले होते. जगभर खळबळ उडवून दिलेल्या ‘मी टू’ मोहिमेने ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी’ अर्थात विषारी पौरूष हा शब्द जन्माला घातला होता आणि तो सर्वाधिक प्रचलितही झाला. त्यामुळे या शब्दावर सर्वाचेच एकमत झाले. मात्र त्याचवेळी ‘टॉक्सिक’ हा शब्दच या वर्षांत कितीतरी संदर्भात वापरला गेल्याचा मुद्दा पुढे आला.