सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 17 मार्च 2018 (17:02 IST)

भयंकर : मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारला

पुण्यातील एका मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारण्यात आला. शहरातील विमाननगर परिसरात 'फोनिक्स मोर्केट सिटी' हा मॉल येथे हा प्रकार घडला.   सोनाली ही तृतीयपंथी आपल्या मित्रासोबत गेली होती. त्यावेळी तिला प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं. मॉलमध्ये 'तृतियपंथियांना प्रवेश नसल्याचं' कारण तिला सांगण्यात आलं. सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट व्हायरल  झाला. श्याम कोन्नूर या सोनियाच्या मित्रानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
 

दरम्यान, आपला सोनालीचा अवमान करण्याचा हेतू नव्हता. यापूर्वी तृतियपंथियांकडून आलेला अनुभव चांगला नसल्यानं सोनालीला प्रवेश नाकारण्यात आल्याचं स्पष्टीकरण फोनिक्स मार्केट सिटीतर्फे देण्यात आलंय. आम्हाला माणूस म्हणून जगू द्या... मी सहन केलं पण इतरांनी या गोष्टी सहन करू नयेत... यासाठीच या घटनेबद्दलची आपण तक्रार दाखल करणार असून मानवाधिकार आयोगाकडेची आपण दाद मागणार असल्याचं पीडित सोनाली दळवी यांनी म्हटलंय.