बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : मंगळवार, 31 मार्च 2020 (16:14 IST)

व्हायरल ऑडिओमध्ये नागपुरात कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह प्रकरणांचा दावा खोटा

देशभरात कोरोनानं थैमान घातलं असून या बाबत सोशल मीडियावरून अफवांही पसरत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाचे 1400 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत अडीशे रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान एक फेक ऑडिओ व्हायरल होत आहे. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर नागपुरात मोठी खळबळ उडाली होती.
 
ही ऑडिओक्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन तरुणांमधील संभाषण असून पहिला तरुण कोरोनाची माहिती सांगत आहे. नागपुरात 59 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत आणि 200 हून अधिक संशयित लोक असल्याचा दावा करण्यात येत आहे. मेडिकलमधील 3 डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यातील एक डॉक्टर व्हेंटिलेटरवर असल्याचंही हा तरुण दावा करत आहे. याशिवाय नागपूरमधील लॅबोरेट्रीजमध्ये योग्य टेस्ट होत नसल्याचे आरोपही त्याने केले आहेत. 
 
ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलीसांनी सायबर सेलच्या मदतीनं तीन जणांना अटक केली आहे. या तिघांवरही नागपूर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांच्या टीमनं फेक ऑडिओ क्लीप व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अमित पारधी (38), जय गुप्ता (37) अशी ही ऑडिओ क्लीप बनवणाऱ्या तरुणांची नावं आहेत. तर दिव्यांशु मिश्रा (33) तरुणानं ही क्लीप सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे.  
नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 12 वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात व्होटसअँप वर अत्यंत बेजबाबदार तसेच दिशाभूल करणाऱ्या आडिओ व व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहेत, अशा चुकीची माहिती अथवा चुकीचा संदेश पाठविणे, पोस्टकरणे अफवा पसरविणे हा गंभीर गुन्हा आहे, याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे, असं आवाहन नागपूर पोलिसांनी केलं आहे.

symbolic picture