गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 18 एप्रिल 2024 (15:24 IST)

अखेर नारायण राणेंचं नाव जाहीर

rane
भाजपाच्या पारड्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आले असून या जागेवरून असलेला तिढा सुटला आहे. व या जागांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे याना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच या जागेसाठी इच्छुक असणारे किरण सामंत याचे बंधू मंत्रींनी पत्रकार परिषद घेतल्याची माहिती मिळाली असून, ते म्हणाले की, उमेदवारीवरून असलेला तिढा सुटला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आम्ही त्यांना पाठींबा देणार असं ते म्हणालेत.
 
किरण सामंत यांना निवडणूक लढवायची होती तसेच पण आता त्यांनी स्वतःचे नाव मागे करून नारायण राणेंना उमेदवारी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात त्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन असतील. या पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंत म्हणालेत की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून देखील रस्सी खेच सुरू होती. यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली उमेदवारीसंदर्भात आम्ही चर्चा केली असे ते म्हणालेत.