रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 19 मार्च 2024 (16:16 IST)

गोष्ट पंतप्रधानांची : नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार की आजच्या सर्व समस्यांना जबाबदार?

nehru quotes
कागदी खोळीत उजेड घेऊन चाललेला हातागाडीवाला.मी विचारले, "हा प्रकाश आत्ता कशाला नेतो आहेस?"
"वा राव; पुढे काळोख दात विचकित असेल !"
नेहरू गेले त्यावेळची गोष्ट !......
27 मे 1964 तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल यांच्या निधनानंतर नारायण सुर्वे यांनी या ओळी लिहिल्या होत्या. त्या काळात असलेल्या लोकांच्या भावनाच त्यांनी या ओळीतून मांडल्या होत्या.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून ते गुजरातपर्यंत त्यांची जादू जनमानसावर होती. महात्मा गांधी यांच्यानंतर इतकी लोकप्रिय व्यक्ती त्यावेळी भारतात नव्हतीच. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मध्यरात्री बारा वाजता त्यांनी दिलेले भाषण 'ट्रिस्ट विथ डेस्टिनी' हे अनेकांनी त्या काळात पाठच केले होते.पारंपरिक शेरवाणीला बाह्या नसलेले जॅकेट ते घालायचे, त्यालाच पुढे नेहरू जॅकेट म्हटलं जाऊ लागलं आणि ते आजही प्रसिद्ध आहे यावरुनच त्यांच्या लोकप्रियतेची झलक पाहायला मिळते, आजही कुणी कोटाला फुल लावले तर नेहरूंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
 
पं. नेहरू हे देशातील सर्वाधिक काळ राहिलेले पंतप्रधान आहेत. पं. नेहरू हे सलग 16 वर्षं पंतप्रधान राहिले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, पंतप्रधान म्हणून दोन टर्म पूर्ण केल्यानंतर पं. नेहरूंची पंतप्रधानपदी राहिण्याची इच्छा नव्हती. मग असं काय घडलं आणि ते आणखी पाच वर्षं म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत पंतप्रधान राहिले.
 
केरळ लिटरेचर फेस्टिवलमध्ये काँग्रेसचे खासदार आणि नेहरू- इन्वेन्शन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक शशी थरूर यांनी सांगितलं होतं, "पं. जवाहरलाल नेहरूंनी 1958 मध्ये आपला राजीनामा दिला आणि हिमालयात काही महिन्यांसाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. अनेक वर्षं आपण देशाची सेवा केली आहे तेव्हा आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे. इतर कुणीतरी आता ही जबाबदारी स्वीकारावी असं पत्र पं. जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेस वर्किंग कमिटीला लिहिलं होतं.
 
"पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी राजीनामा तर दिला पण त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास कुणीच तयार नव्हतं. भारतातील काँग्रेसचे नेते, देशातील जनता इतकंच काय तर अमेरिका आणि रशियाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी नेहरूंना गळ घातली की तुम्ही राजीनामा देऊ नका.
 
"सर्व बाजूंनी दबाव निर्माण झाल्यावर पं. नेहरूंना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. पं. नेहरूंनी सहा महिन्यांसाठी हिमालयात सुट्टी घेण्याची तयारी केली होती पण त्यांना केवळ 15 दिवसात परत यावे लागले आणि पुन्हा पंतप्रधानपदाची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी लागली."यावरुनच आपल्याला नेहरूंची लोकप्रियता आणि त्यांची जनमानसातील प्रतिमा कशी होती याची कल्पना येऊ शकते.काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पं. नेहरूंचा उल्लेख केला आणि भारताच्या अधोगतीला नेहरूच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.नेहरू हे देशातील सर्वांधिक चर्चेतील राजकीय नेते ठरले आहेत.

इतक्या वर्षांनंतर त्यांचे फोटो सोशल मीडियात फिरवले जातात आणि त्यावर चर्चा होते. त्यांच्या बाजूने आणि विरोधात बोलणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यावरुन त्यांची प्रासंगिकता लक्षात येते. त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं होतं याचा शोध या लेखातून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 
पंडित नेहरूंचे बालपण
आपण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंडित नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा करत आहोत तर मग आता त्यांच्या बालपणाच्या गोष्टी कशासाठी, असा प्रश्न पडू शकतो. पण ती व्यक्ती समजून घ्यायची असेल तर त्या व्यक्तीचं बालपण तितकंच आवश्यक असतं असं म्हटलं जातं.पं. नेहरूंनी त्यांच्याच शब्दांत त्यांच्या लहानपणाबद्दल सांगितलं आहे. नेहरूंनी त्यांच्या लहानपणाचं वर्णन 'अनइंव्हेटफुल' असं केलं आहे.जवाहरलाल यांचे वडील मोतीलाल नेहरू हे अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस करत होते. आपल्या व्यवसायात आणि राजकारणात दोन्ही ठिकाणी ते यशस्वी होते. जवाहरलाल यांच्या पाठीवर असलेल्या भावंडात आणि त्यांच्यात बरंच अंतर होतं आणि त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या वयाचं कुणी घरात नव्हतं.
 
तेव्हा ते त्यांच्याहून मोठ्या वयाच्या चुलत भावंडांच्या गप्पांमध्ये सामील होत असत. म्हणजे केवळ ते ऐकत असत. त्यातून तत्कालीन परिस्थितीची आणि त्याबद्दल नेहरूंना काय वाटत असे याविषयीची कल्पना येते.त्यावेळी इंग्रज सरकारमधील अधिकारी भारतीयांसोबत भेदभाव करत असत याबद्दल पं. नेहरूंच्या मनात चीड निर्माण होत होती.अलाहाबादमध्ये असलेल्या बाग-बगीचांमध्ये इंग्रजांसाठी वेगळे बेंच असत आणि इतरांसाठी वेगळे. इंग्रजांच्या बेंचवर भारतीयांना बसण्याची परवानगी नसे. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागल्याचे त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
 
पं. नेहरूंना शिकवण्यासाठी घरी ट्युटर येत असे. लहान वयापासून त्यांना शिकण्याची आवड होती. शालेय पुस्तकांबरोबरच गोष्टींची पुस्तकं त्यांना आवडत. अरेबियन नाइट्स, रामायण-महाभारत या गोष्टींसोबतच विविध लोककथा त्यांनी लहानपणीच वाचल्या होत्या. अलाहाबादच्या गंगा-जमनी तहजीबचा प्रभाव त्यांच्यावर लहानपणापासूनच दिसतो.यातूनच पुढे ते धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांबाबत बोलताना आणि ते जगताना आपल्याला दिसतात. दिवाळी, जन्माष्ठमी असो की मोहर्रम किंवा ईद या सर्व सणांमध्ये ते सहभागी होत.घरातील पुरुष मंडळी ही धार्मिक स्वरूपाची नव्हती, जितक्या पुरतं तितकं त्यांचं स्वरूप होतं पण महिला मात्र भक्तिभावाने पूजा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. इंग्लंडमधील हॉरो बोर्डिंग स्कूलमध्ये ते शिकले.
वयाच्या 20 व्या वर्षीच ते केंब्रिजमधून पदवीधर झाले होते. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या राजकीय चर्चेत ते सहभागी होत असत. जगभरातील राजकारणाची आणि घटनांची त्या ठिकाणी चर्चा होत असे त्यातून त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित झाला होता.इंग्लंडमधील विचारवंतांची विज्ञाननिष्ठ मांडणी त्यांच्या मनाला भावली होती हाच दृष्टिकोन पुढे त्यांनी आणखी विकसित केल्याचे आपल्याला दिसून येते.

पदवी संपल्यानंतर पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आला होता. सनदी परीक्षांसाठी बसण्याचा पर्याय देखील त्यांच्यासमोर होता पण त्यासाठी आणखी तीन चार वर्षं तिथे थांबावे लागले असते.
या परीक्षेला बसण्यासाठी 23 वर्षं पूर्ण झाली असणे ही अट होती, त्यामुळे आणखी तीन वर्षं थांबून नंतर परीक्षा देणे हे त्यांना योग्य वाटले नाही.इंग्रजांच्या शासनाबद्दल मनात चीड होती पण तरीदेखील ICSला बसणे अयोग्य आहे असं त्यावेळी आपल्याला वाटत नव्हतं. त्याबद्दलचा विचार हा पुढे तयार झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
 
शेवटी वडिलांच्याच व्यवसायात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि कायद्याचे शिक्षण त्यांनी घेतले. या काळात ते एकानंतर एक परीक्षा पास होत गेले.
कायद्याचा अभ्यासक्रम ना अवघड वाटला ना सोपा, त्यामुळे कोणतीही अडचण न येता मी पास होत गेलो पण खूप भव्य दिव्य यश देखील आपल्याला या परीक्षांमध्ये मिळालं नव्हतं असं त्यांनी म्हटलं आहे.
1912 ला भारतात परतल्यानंतर नेहरूंनी वडिलांसोबत प्रॅक्टिस सुरू केली. त्यावेळी पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं आणि देशाच्या राजकारणात तेव्हा लोकमान्य टिळक, अॅनी बेझंट, गोपालकृष्ण गोखले यांचा दबदबा होता.

लोकमान्य टिळकांबद्दल आणि ना. गोखले यांच्याबद्दल त्यांना आदर वाटत होता आणि राजकारणाबद्दल आकर्षण वाटत होते. त्यांचे वडील देखील राजकारणात सक्रिय होते. विविध सभांना त्यांची उपस्थिती राहायची.1916 मध्ये ते महात्मा गांधींना भेटले. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या लोकांसाठी केलेले कार्य आणि चंपारणचा सत्याग्रह याची माहिती त्यांना होतीच.त्यांच्या या कार्याने ते प्रभावित झाले होते. सरोजिनी नायडूंनी राष्ट्रवादावर दिलेल्या भाषणातून त्यांना ही जाणीव झाली की आपण देखील एक कट्टर राष्ट्रवादी आहोत.
 
पं. नेहरू यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
अगदी सुरुवातीच्या काळापासूनच पं. नेहरू हे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले आणि त्यांच्या या पार्श्वभूमीचा फायदा त्यांना स्वतः प्रशासनात असताना झाला. समाजातील विविध घटकांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यानुसार उपाययोजना आखण्यासाठी त्यांचे अनुभव त्यांच्या कामी आले.

पं. नेहरू हे राजकारणात एक कार्यकर्ताच म्हणून आले आणि हळूहळू एक एक आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केलं.
सर्वाधिक वेळा तुरुंगवास भोगलेले पंतप्रधान असा देखील त्यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकूण 9 वेळा तुरुंगात जावं लागलं होतं.1920 मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मार्चचं आयोजन केलं होतं. एक उच्च विद्याविभूषित तरुण शेतकरी आंदोलनात उतरतोय हे पाहण्याची भारताची काही ही पहिलीच वेळ नव्हती.दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या महात्मा गांधींनी नीळच्या शेतकऱ्यांसाठी चंपारणचा सत्याग्रह केला होता.पण अनेकांना हा प्रश्न पडू शकतो की पं. नेहरूंनी आपल्या आंदोलनांची सुरुवात या आंदोलनाने का केली असावी?याचं उत्तर आपल्याला त्यांच्या आत्मचरित्रात मिळतं, नेहरू लिहितात, '1921 हे वर्षं आम्हा सर्वांसाठी एकमेवाद्वितीयच होतं. राष्ट्रवाद, राजकारण, धर्म, गूढता आणि धार्मिक कट्टरतावादांचं एक वेगळंच मिश्रण या काळात पाहायला मिळालं. या सर्व गोष्टींच्या पाठीमागे आपल्या देशातील कृषी समस्या आणि मोठ्या शहरात कामगार वर्गाच्या चळवळीचा जो उदय झाला त्यात पाहायला मिळतं.'पं. नेहरू यांचे केवळ स्वातंत्र्यालाच प्राधान्य नव्हते तर सर्वच वर्गांच्या उत्थानाबाबत कळवळा होता त्यातूनच त्यांनी कामगार आणि शेतकरी चळवळीत स्वांतत्र्यपूर्व काळात सहभाग घेतल्याचं समजतं.
 
1920-22 दरम्यान असहकार चळवळीवेळी त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले होते.
1921-22 मध्ये असहकार आंदोलन हे त्याच्या शिखरावर होते. पण चौरीचौरा या ठिकाणी आंदोलकांनी पोलीस चौकी पेटवून दिली आणि त्यात 22 पोलीस आणि 3 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महात्मा गांधींने हे आंदोलन मागे घेतले होते.हे आंदोलन मागे घेतल्याचं नेहरू आणि इतर काँग्रेस नेत्यांना दुःख झालं होतं. नेहरू हे आंदोलन मागे घेतल्यानंतर घटनेनंतर उद्विग्न झाले होते. याबाबत त्यांनी म्हटलं होतं की "चौरीचोराचे आंदोलन मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेते नाराज झाले होते आणि तरुण लोक तर आणखी प्रक्षुब्ध झाले होते.

"आमच्या सर्व आशा धुळीला मिळाल्या होत्या आणि अशा प्रकारची आमची मानसिक प्रतिक्रिया होणे हे स्वाभाविकच होते. सर्वांत वेदनादायी गोष्ट होती ती म्हणजे हे आंदोलन थांबवण्यासाठी देण्यात आलेलं कारण आणि आंदोलनानंतर झालेला घटनाक्रम," असं नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.
 
हे आंदोलन महात्मा गांधींनी थांबवलं होतं, पं. नेहरू यांनी गांधींजी नेतृत्व मान्य केलं होतं तरी हे आंदोलन थांबवल्यानंतरची नाराजी त्यांनी जाहीररित्या प्रकट केली होती.
इतकेच नाही तर त्यांनी हे देखील म्हटले होते की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसेचा मार्ग आपण स्वीकारला आहे पण या मार्गाच्या तत्त्वज्ञानात आणि वापरात अर्थातच काही कमी आहे. इतक्या स्पष्टपणे त्यांनी गांधींजीविरोधात आपली भूमिका आपल्या मांडली होती.त्याचवेळी त्यांनी हे देखील पाहिले की गांधींजीने दिलेले अहिंसेचे तत्त्व काय आहे, त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि त्यामागचे तत्त्वज्ञान काय आहे.

त्यानंतर मात्र त्यांनी गांधींजींच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात पूर्णपणे झोकून देऊन काम केल्याचे दिसते.आंदोलनात सहभागी होता होताच त्यांनी काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात पण भाग घेतला. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. या निमित्ताने विविध देशांमध्ये फिरून त्यांनी भारताची भूमिका जगासमोर मांडली.
 
पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर ते पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री बनले. त्यांनी दिलेली पंचसूत्री हा आजही आपल्या विदेश नीतीचा प्राण समजली जाते. त्याची बीजं त्यांनी या काळात केलेल्या दौऱ्यांमध्ये होती
1929 मध्ये पंडित नेहरू काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते. यापूर्वी काँग्रेसची मागणी ही सेल्फ गवर्नन्स म्हणजेच स्वप्रशासन अशी होती. पण ती त्यांच्या नेतृत्वात बदलून आता स्वराज्य आणि पूर्ण स्वातंत्र्य अशी करण्यात आली होती. हा एक मोठा बदल काँग्रेस आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनातील इतिहासात त्यांच्याच नेतृत्वात घडल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

महात्मा गांधींच्या नेतृत्वात झालेल्या सर्व आंदोलनात ते सहभागी झाले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार विविध माध्यमांतून केला.
गांधीजींनी मीठाचा सत्याग्रह सुरू केला. सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि गरजेचा प्रश्न त्यांनी ऐरणीवर तर आणलाच पण सामान्य माणसाचा प्रश्न हा स्वातंत्र्य आंदोलनाच्या केंद्रस्थानी असू शकतो हे देखील दाखवून दिले. त्यांच्या लढ्यात काँग्रेस पूर्ण शक्तिनिशी उतरली होती. या आंदोलनाच्या काळात पं. नेहरू यांना अनेकवेळा तुरुंगवास घडला होता. तुरुंगात असताना त्यांनी विपुल लिखाण केले.
 
1935 साली त्यांनी तुरुंगात असताना आत्मचरित्र पूर्ण केले आणि हे आत्मचरित्र 1936 मध्ये प्रकाशित करण्यात आले. हे आत्मचरित्र केवळ त्यांच्याच आठवणी आणि घटनांचा संग्रह नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळ समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा दस्तावेज मानण्यात येतो. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहात ते सहभागी झाले होते. विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते तर पं. नेहरू हे दुसरे सत्याग्रही होते. पुढे ते भारत छोडोमध्ये देखील सहभागी झाले होते. भारत छोडोवेळी त्यांना जो तुरुंगवास झाला होता त्यावेळी त्यांना अहमदनगर येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते.भारत छोडोचे आंदोलन शिखरावर असतानाच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. आझाद हिंद सेनेच्या अनेक अधिकाऱ्यांना तुरुंगवास झाला आणि इंग्रजांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला होता. 1945 मध्ये पं. नेहरूंनी आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांचे वकीलपत्र घेऊन त्यांचा बचाव केला. पण हा खटला नेहरू हरले. असं असलं तरी त्यांचा सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याला असलेला पाठिंबा आणि त्यांचे राष्ट्रप्रेम यातून दिसून येते.
 
पं. नेहरू देशाचे पंतप्रधान कसे बनले?
पं. नेहरू यांच्या पंतप्रधान बनण्यावरुन अनेक आक्षेप आणि उलट सुलट चर्चा होते. त्यात एक मतप्रवाह असा देखील आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखा लोहपुरुष असताना महात्मा गांधींनी पटेलांची निवड न करता पं. नेहरूंची का निवड केली. यात एक गंमत अशी आहे की नेहरूच्या बाजूने किंवा पटेलांच्या बाजूने असो दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांचे या गोष्टींवर एकमत आहे की महात्मा गांधींच्या हाती तेव्हा सत्तेची किल्ली होती. आणि महात्मा गांधी जे ठरवतील तीच व्यक्ती पंतप्रधान होणार हे उघड होते. आपण त्याच ठिकाणाहून या गोष्टीला सुरुवात करू की पटेलांऐवजी महात्मा गांधींने नेहरूंना का निवडले त्यांचा राजकीय वारस म्हणून का निवडले.

पं. नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात अनेक गोष्टींहून मतभेद होते. पण ते मतभेद केवळ साधनांबाबत होते साध्याबाबत नव्हतेच. दोन्ही नेते लोकशाहीवादी होते, दोन्ही नेत्यांच्या मनात सामान्य जनतेच्या उत्थानाविषयी तितकाच कळवळा होता आणि दोघांचेही नेतृत्व स्वातंत्र्यलढ्यातील विविध आंदोलनातूनच तयार झाले होते.
मग अशा वेळी कोणत्या गोष्टी होत्या ज्यात पं. नेहरू उजवे ठरले आणि सरदार पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री झाले आणि पं. नेहरू हे पहिले पंतप्रधान.
 
1929 लाच महात्मा गांधी यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांचे राजकीय वारस हे नेहरूच राहतील. त्यावेळी स्वातंत्र्य हे दृष्टिक्षेपातही नव्हते पण गांधीजींनी आधीच याबाबत सांगितले होते. त्याची कारणमीमांसा आजवर अनेक इतिहासाकाराने केली आहे. त्यातून एक असं मत निघतं की त्यावेळेस असलेल्या नेत्यांमध्ये पं. नेहरू हे इंग्रजांसोबत वाटाघाटी करण्यात, देशात असलेले नाजूक प्रश्न संवेदनशीलतेने हाताळण्यात सक्षम होते. केवळ भारतच नाही तर इतर देशातील लोकदेखील त्यांच्याकडे एक उदयोन्मुख नेता म्हणून पाहत होते.

ही गोष्ट पुढे नेहरूंनी सिद्ध केली जेव्हा त्यांनी अलिप्ततावादी चळवळीचे नेतृत्व केले. अशा प्रकारे अनेक देशांचे नेतृत्व करणारा नेता त्यानंतर भारतातच काय पण जगात देखील झाला नाही हे आपण पाहिलेच आहे. याचे श्रेय गांधीजींच्या दूरदष्टीलाही द्यावे लागेल आणि तितकेच नेहरूंच्या कृतीप्रवणतेला द्यावे लागेल.

जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नेहरू हे 56 वर्षांचे होते आणि सरदार पटेल 71 वर्षांचे. पंतप्रधानपदासारख्या धावपळीच्या पदावर थोडी तरुण व्यक्ती असावी हा विचार गांधीजींनी केला होता हे त्यांच्या पत्रव्यवहारावरुन आपल्याला दिसून येतं. आपल्या प्रकृतीची हेळसांड केल्याबद्दल महात्मा गांधींनी पटेलांना सुनावले होते.
 
नेहरूंच्या तुलनेत पटेल नेमके कोणत्या बाबती सरस होते याबद्दल सांगताना बीबीसी हिंदीसाठी लिहिलेल्या लेखात लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार दयाशंकर शुक्ल सागर लिहितात की मोहम्मद अली जीना यांच्याबरोबर वाटाघाटी करण्यासाठी पटेल हे योग्य नेते आहेत असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होतं पण गांधीजींनी नेहरूंची निवड केली.
आपल्या लेखात त्यांनी महात्मा गांधींच्या समग्र साहित्याचा संदर्भ देत सांगितलं की महात्मा गांधींनी तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना आझाद यांना पत्र लिहून सांगितले की तुम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. काँग्रेसचाच अध्यक्ष हा देशाचा काळजीवाहू पंतप्रधान होईल हे त्यावेळी उघडच होते. त्यामुळे त्यांनी आझाद यांना पत्र लिहून आपला मनोदय कळवला होता.

कोणताही आडपडदा न ठेवता गांधीजींना थेट सांगितले होते की "जर तुम्ही मला सल्ला मागितला तर मी जवाहरलालचं नाव सांगेन. याची अनेक कारणं आहेत पण ती सांगणे मला योग्य वाटत नाही."
या पत्रानंतर काँग्रेसमध्ये हे पसरलं की गांधीजींना नेहरूंनाच पंतप्रधान करायचं आहे. 29 एप्रिल 1946 रोजी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा अध्यक्ष निवडायचा होता आणि तीच व्यक्ती काळजीवाहू पंतप्रधान बनणार होती.
पुढे झालं ही तसंच काँग्रेस वर्किंग कमिटीचा अध्यक्ष प्रांतीय कमिटीच्या अध्यक्षांच्या संमतीने निवडला जायचा. 15 पैकी 12 प्रांतीय कमिटीच्या अध्यक्षांना पटेल हे वर्किंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून हवे होते.
 
काँग्रेस वर्किंग कमिटीचा अध्यक्ष निवडण्यासाठी गांधीजींनी प्रस्ताव तयार केला आणि त्यात पटेल आणि नेहरूंची नावे टाकली. गांधीजींनी नेहरूंना विचारले की तुमच्या नावाचा प्रस्ताव कुणीच दिलेला नाही. त्यावर नेहरूंनी मौन बाळगले. निर्णय घेण्याची वेळ गांधीजींची होती. गांधीजींनी त्यासाठी एक वेगळा प्रस्ताव सादर केला.
 
जर पटेलांनी आपले नाव मागे घेतले असते तरच ही निवड बिनविरोध होऊ शकली असती. पुन्हा गांधीजींनी पटेलांना विचारले की तुमचं काय म्हणणं आहे यावर पटेलांनी प्रस्तावावर सही करत आपले नाव परत घेतले. ही गोष्ट तत्कालीन काँग्रेसचे सरचिटणीस आचार्य कृपलानी यांनी 'गांधी हिज लाइफ अँड थॉट' या पुस्तकात लिहिली आहे असं दयाशंकर शुक्ल सागर लिहितात. यानुसार नेहरू हे वर्किंग कमिटीचे अध्यक्ष झाले आणि 15 ऑगस्ट 1947 ला देशाचे काळजीवाहू पंतप्रधान बनले. पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी आपल्या विरोधकांना देखील स्थान दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेस आणि नेहरूंच्या धोरणावर टीका करत असत.
 
त्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले होते. त्याचबरोबर हिंदू महासभेचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले होते. दोन्ही नेत्यांना त्यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि राजकीय योग्यतेनुसार पदं दिली होती. आपल्याला मिळाले स्वातंत्र्य हे केवळ काँग्रेसचेच नाही तर सर्वांचेच आहे, अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे त्यांनी विविध पक्षातील लोकांना आपल्या मंत्रिमंडळात घेतले होते.
 
नेहरूंवरील आक्षेप आणि त्यांना वारशात मिळालेल्या गोष्टी
पं. नेहरू जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा खूप मोठा आनंदोत्सव त्यांच्या अनुयायांनी साजरा केला असं घडलं नाही. ज्या वेळी ते पंतप्रधान झाले ती स्थितीच वेगळी होती.
 
पं. मोतीलाल नेहरू यांचा राजकीय वारसा आणि महात्मा गांधींनी त्यांना आपला राजकीय वारस मानल्या मुळे त्यांच्या गळ्यात काळजीवाहू पंतप्रधानपदाची माळ तर पडली होती. पण या पदाबरोबरच आणखीही काही गोष्टी मिळाल्या होत्या.
 
का देशाची झालेली फाळणी आणि त्यानंतर जागोजागी उसळलेले दंगे, पाकिस्तानची निर्मिती होऊन देशाच्या दोन्ही बाजूंना असलेली तणावग्रस्त स्थिती, महात्मा गांधींची हत्या आणि भडकलेल्या दंगली, त्यावेळी असलेले देशातले साक्षरतेचे अल्पप्रमाण, गरिबी, संस्थानिकांचा प्रश्न, राज्यघटनेची निर्मिती, भाषाववर प्रांतरचनेचा प्रश्न, महिलांच्या हक्कांविरोधात लढणारी पुरुषप्रधान मानसिकता, सिंचनाचा अभाव असल्यामुळे निर्माण झालेले शेतीसंकट, इंग्रज गेल्यानंतर चीनने सियाचिनवर सांगितलेला दावा इत्यादी गोष्टी त्यांना पंतप्रधानपदाच्या जबाबदारीसोबतच मिळाल्या होत्या. अर्थात पं. नेहरूंचे विरोधक केवळ त्यांना या समस्या न सोडवण्यासाठी किंवा चिघळवण्यासाठी जबाबदार धरतात, या समस्या त्यांनीच निर्माण केल्या होत्या असे न म्हणून एकप्रकारे त्यांनी नेहरूंवर उपकारच केले आहेत. या प्रत्येक समस्येसाठीच जर नेहरूंना जबाबदार धरायचं म्हटलं तर मुळात हे प्रश्न तयार कसे झाले आणि त्याची उत्तर कुठे होती याचा शोध घेणे देखील तितकेच अनिवार्य ठरते.
 
पं. नेहरुंनी घेतलेल्या अनेक निर्णयावर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यातील मुख्य आक्षेप दोन आहेत. एक म्हणजे पं. नेहरूंनी काश्मीरचा प्रश्न हा संयुक्त राष्ट्रांकडे नेला त्यामुळे तो आणखी चिघळला आणि पं. नेहरूंनी कठोर भूमिका न घेतल्यामुळे चीनने भारताशी युद्ध केले आणि भारताचा पराभव झाला. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात देण्याइतकी सोपी असू शकतात का?
 
पण या आणि अनेक अशा समस्यांना जेव्हा नेहरूंना जबाबदार धरले जाते तेव्हा 'पं. नेहरू: एक मागोवा' या पुस्तकाचे लेखक डॉ. न. गो. राजूरकर आणि प्रा. नरहर कुरुंदकर लिहितात, "भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरंसमोर उभ्या असणाऱ्या समस्या विविध होत्या आणि एकेका समस्येचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचेव अजस्र होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
 
"भारताच्या समस्या एकाएकी निर्माण झालेल्या नव्हत्या. शतकानुशतके त्या साठवत आलेल्या होत्या. इंग्रजांच्या शे-दीडशे वर्षांच्या राजवटीत यातील अनेक समस्या कुजविलेल्या होत्या. लोकांची इच्छा अगदीच साधी आणि एका वाक्यात संपणारी होती."
 
पुढे लेखक लिहितात, "त्यांना सर्व प्रश्नांची तत्काळ आणि समाधानकारक सोडवणूक हवी होती. कोणत्याही नवस्वतंत्र देशातील जनतेची अशी आतुर आणि उत्कट इच्छा असते आणि तशी भारतीयांची होती. जनतेच्या अपेक्षा या होत्या याबद्दल त्यांना दोष देण्याचे कारण नाही.
 
"पण या अपेक्षा पूर्ण करता येणे मानवी शक्यतेच्याही पलीकडचे होते. नेहरूंचे मोठेपण असेल तर ते यात आहे की स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतासमोरील प्रश्नांचा त्यांनी विचार सुरू केलेला होता आणि स्वतःच्या मनाशी त्यांनी प्रश्नांच्या उलगड्यासाठी काही दिशा निश्चित केलेल्या होत्या," असं राजूरकर आणि कुरुंदकर आपल्या पुस्तकात लिहितात.
 
देशाची पहिली निवडणूक
देशाची पहिली निवडणूक होण्याआधीच सरदार पटेल यांचे निधन झाले होते. संस्थानिकांना देशात सामील करुन घेण्याचा अत्यंंत जटील प्रश्न त्यांंनी सोडवला होता आणि याबाबत नेहरूंंनी नेहमी त्यांची स्तुती केल्याचे त्यांच्यापत्रव्यवहारावरुन दिसते. महात्मा गांधीनी त्यांना काळजीवाहू पंतप्रधान केल्यामुळे ते देशाचे पंतप्रधान बनले असा एक समज आपल्याला दिसून येतो. पण त्यानंतर पं. नेहरू यांच्या नेतृत्वात झालेल्या तीन निवडणुकात 1952, 1957 आणि 1962 साली झालेल्या निवडणुकात काँग्रेसने अंदाजे 490 लोकसभेच्या जागांपैकी अनुक्रमे 364, 371 आणि 361 जागा जिंकल्या होत्या.
 
केवळ निवडणूक लढवणे हाच नेहरूंचा या मागचा उद्देश नव्हता तर देशात लोकशाहीची मूल्यं रुजवायची, राज्यघटनेचा प्रचार प्रसार करायचा आणि जास्तीत जास्त लोकांना भेटून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे काम नेहरूंनी आपल्या प्रचारसभातून केले. त्यांच्या प्रचाराचा सूर कुठेही विरोधकांवर किंवा इंग्रजांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर नव्हता.
 
नेहरू हे निर्विवादपणे लोकप्रिय होते आणि पण केवळ लोकप्रिय आहेत म्हणून ते लोकांचा अनुनय करणारे निर्णय घ्यायचे असं नाही. त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले ज्यामुळे आपली लोकप्रियता धोक्यात येईल याची जाणीव त्यांना होती. पं नेहरू भाषावर प्रांतरचनेच्या विरोधात होते. त्यामुळे देशांमध्ये अंतर्गत विभाजन होईल त्यापेक्षा राज्ये बहुभाषिक असावीत असं त्यांचं मत होतं.त्या मतावर ते अनेक वर्षं ठाम होते पण जेव्हा वेगळ्या आंध्रप्रदेशच्या निर्मितीसाठी पोट्टी श्रीरामलु यांचे प्राणांतिक उपोषणात प्राण गेले तेव्हा त्यांनी लोकांच्या मर्जीनुसार भाषावार प्रांतरचनेला परवानगी दिली होती. या घटनेच्या एकाच वर्षानंतर देशात पहिल्या निवडणुका झाल्या आणि त्यात काँग्रेसला 364 जागा मिळाल्या यावरुन हेच दिसून येतं की देशातील जनतेला सुद्धा नेहरूंकडे केवळ घटनांच्या दृष्टिक्षेपातून पाहत नव्हते तर नेहरूंचे एकूण व्यक्तिमत्व, त्यांचा समाजातील वावर आणि त्यांचे लोकशाहीवरील प्रेम याच भावनेतून पाहत असत.
 
नेहरू आणि त्यांचे लोकशाहीवरील प्रेम
पहिल्या निवडणुकीत पं. नेहरू कसा प्रचार करायचे याबाबत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी हिंदुस्तान टाइम्ससाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की नेहरूंनी कधीही आपल्या समोर असलेल्या समस्यांचा पाढा वाचला नाही. उलट त्यांनी प्रत्येकाला हेच सांगितलं की जर प्रत्येक व्यक्तीने जर देशाच्या प्रगतीसाठी काम केलं तर देशाची प्रगती शक्य आहे. धार्मिक तेढ आणि त्यातून उद्बवणाऱ्या समस्यांचा त्यांना राग होता. जर कुणी धर्माच्या नावावर जर इतर व्यक्तीशी भांडत असेल तर अशा प्रवृ्त्तींच्या मी कायम विरोधात राहील. सरकारमधून असो वा बाहेरुन असो अशा शक्तींविरोधात मी ठामपणे उभा आहे असे ते कडाडत.

जे लोक म्हणायचे हिंदू धर्माची अधोगती होत आहे, त्यावर ते म्हणायचे की प्रत्येक व्यक्तीची स्थिती सुधारणे हीच धर्माची सेवा ठरते. महिलांच्या प्रश्नांबाबत ते जागरुक होते आणि जे लोक प्रत्येक गोष्टींमध्ये धर्म आणत असत त्यांना ते सांगायचे की अशा प्रकारचा विचार करणारे मन हे संकुचित असते. त्यांची कधीच प्रगती होऊ शकणार नाही.
 
पं. नेहरू यांनी केवळ निवडणुकाच लढवल्या नाहीत तर देशात खूप मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा त्यांनी उभ्या केल्या. भाकरा नांगलचा प्रकल्प यशस्वी करणे असो वा मुंबईतील आण्विक संशोधक केंद्राची स्थापना असो, आयआयटी, आयआयएम, इस्रो, पंचवार्षिक योजना, सार्वजनिक क्षेत्रातील कारखाने अशा अनेक महत्त्वकांक्षी योजना त्यांच्या 16 वर्षांच्या काळात पार पडलेल्या आपल्याला दिसतात.
 
त्यांनी आखून दिलेल्या कार्यक्रमावरच आपल्या देशाची वाटचाल झालेली पाहायला मिळते. त्यामुळेच त्यांचा आदर करणारे लोक सर्वच पक्षात पाहायला मिळतात.
जेव्हा पं. नेहरूंचा फोटो परराष्ट्र खात्यातून काढण्यात आला होता तेव्हा जनता सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेल्या अटल बिहारी वाजपेयींना ही गोष्ट आवडली नव्हती. त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले की पं. नेहरूंचे चित्र कुठे गेले, काहीच उत्तर मिळाले नाही पण पुन्हा ते चित्र त्या जागी परतले.
नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते की आजच्या सर्व समस्यांना ते जबाबदार होते या दोन्ही बाजूने अनेक तर्क आहेत, तेव्हा ते नेमके कोण होते याचा निर्णय हा सर्वस्वी त्या व्यक्तींवर अवलंबून आहे.
पण नेहरूंचे लोकशाहीवर आणि देशातील लोकांवर किती प्रेम होते हे समजून घेण्यासाठी हा प्रसंग पुरेसा ठरू शकतो.
 
पं. नेहरू हे लोकनेते होते. त्यांनी नेहमी त्यांच्या भावनांची कदर केल्याचे पाहायला मिळते आणि कुणी कितीही त्यांच्यावर राग व्यक्त केला तर त्यांचे लोकांवरील प्रेम आणि लोकशाहीवरील निष्ठा कधी ढळली नाही हेच दिसले आहे. नेहरूंच्या बाबतीत एक किस्सा सांगितला जातो. बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी इकबाल अहमद यांनी या किश्शाचा उल्लेख केला आहे.ते लिहिलात, राममनोहर लोहियांच्या सांगण्यावरुन एक महिला संसद परिसरात आली होती. जसे नेहरू कारमधून उतरले, त्यांच्यासमोर ती महिला आली आणि तिने नेहरूंची कॉलर पकडली आणि म्हटले की भारत स्वतंत्र झाला, तुम्ही देशाचे पंतप्रधान झाला, या म्हातारीला काय मिळालं. यावर नेहरूंच उत्तर होतं की "तुम्हाला हे मिळालं आहे की तुम्ही देशाच्या पंतप्रधानाची कॉलर पकडून उभ्या आहात."
 
याच त्यांच्या गोष्टींमुळे कदाचित जेव्ह

याच त्यांच्या गोष्टींमुळे कदाचित जेव्हा त्यांनी पंतप्रधानपदी न राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा तीव्र प्रतिक्रिया आली असावी आणि त्याच प्रेमातून कवी नारायण सुर्वे म्हणू शकले की 'वा, राव पुढे काळोख दात विचकित असेल, नेहरू गेले त्यावेळची गोष्ट.'

Published By- Priya Dixit