Last Modified: मुंबई , शनिवार, 28 मार्च 2009 (19:26 IST)
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस व रिपब्लिक न पक्षांचा निवडणूक प्रचाराचा नारळ उद्या (रविवार) मुंबईत फुटणार आहे.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते यात सहभागी होतील. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील व रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले हेही सहभागी होणार आहेत.
मुंबईत कॉंग्रेसने गेल्या वेळी पाच जागा पटकावल्या होत्या. यावेळी पक्ष पाच जागा लढवत असून एक जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिली आहे.