शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वेबदुनिया|

जगायचं असेल तर अडवाणींना मत द्या-जोशी

मुंबईसह देशात दहशतवाद वाढत चालला आहे. आता देशात जगण्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. जर जगण्याची शाश्वती हवी असेल तर लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील युतीला निवडून द्यावे असे आवाहन सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केले.

मुंबईत झालेल्या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूवर संशय घेणाऱ्या केंद्रातील सरकारला उखडून काढण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना केले.

देशात दहशतवाद वाढत असल्याने आणि केंद्रातील कॉग्रेस सरकारला दहशतवादावर नियंत्रण करण्यात अपयश आल्याने आता अडवाणी यांना पंतप्रधान करणे गरजेचे असल्याचे जोशी म्हणाले.