दुसर्या टप्प्याची अधिसुचना जारी
सार्वत्रिक निवडणुकीच्या २३ एप्रिलच्या दुसर्या टप्प्यासाठी अधिसुचना आज जारी करण्यात आली. यात महाराष्ट्रातील २५ जागांसह तेरा राज्ये व केंद्र शासित प्रदेशातील एकूण १४१ मतदारसंघांसाठी मतदान होईल. दुसर्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २०, आसाममधील ११, बिहारमधील १३, गोव्यातील दोन, जम्मू काश्मीरमधील एक, कर्नाटकातील १७, मध्य प्रदेशातील १३, मणिपूरमधील १, ओरीसातील ११, त्रिपुरातील दोन, उत्तर प्रदेशातील १७ व झारखंडमधील ८ मतदारसंघांसाठी मतदान होईल. या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख चार एप्रिल असले. आठ एप्रिल माघारीची अंतिम तारीख आहे.