शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वेबदुनिया|

राहुलनंतर सोनिया गांधीही बे-कार

ज्या घराण्‍याचे कपडे धुण्‍यासाठी एकेकाळी पॅरीसला जात असत, त्‍या नेहरु-गांधी घराण्‍याचा वारसा सांगणा-या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची सून तर राजीव गांधींची पत्नी असलेल्‍या कॉंग्रेसाध्‍यक्षा सोनिया गांधी यांच्‍याकडे स्‍वतःची कार नाही, असे जर कुणी सांगितले, तर तुमचा विश्‍वास बसेल का? नाही ना? पण तुम्हाला तो ठेवावा लागेल, कारण ही माहिती दुस-या-तिस-या कुणी दिलेली नाही तर दस्‍तुर खुद्द सोनिया गांधींनीच दिली आहे.

आजच्‍या राजकारण्‍यांकडे कार नव्‍हे तर स्‍वतःचे विमानं व हेलिकॉप्‍टर असताना सोनियांकडे कार नाही हे काहीसे न रुचणारे आहे. सोनियांकडेच नाही तर राहुल गांधींकडेही कार नाही. त्‍यामुळे आश्‍चर्य जरा जास्‍तच वाटतंय. तर दुस-या बाजूला राजकारणात येऊन काही वर्षेच उलटलेल्‍या 'समाजवादी' अबू आजमींकडे मात्र स्‍वतःच्‍या तीन आलिशान कार आहेत. तर 122 कोटींची संपत्ती आहे. तर सोनियांच्‍याच मंत्रिमंडळात असलेल्‍या कमलनाथ हे दोन हेलिकॉप्‍टर व दोन विमानांचे नाथ आहेत.

सोनियांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्‍या प्रतिज्ञा पत्रानुसार त्‍यांच्‍याकडे दीड कोटी रुपयांची संपत्ती आहे. रायबरेली मतदार संघातून दोन वेळा विजयी झालेल्‍या सोनियांकडे 48 लाख रुपये दोन बँकेच्‍या खात्‍यात जमा आहेत. तर 75 हजार रुपये रोख आहेत. याशिवाय भविष्‍य निर्वाह निधी 24 लाख रुपये, एनएसएस 19.5 लाख रुपये, दिल्‍ली जवळ 2.19 लाख रुपयांचे दोन फार्म हाऊस, इटलीत 18.5 लाख रुपये किंमतीचा एक वडीलोपार्जित बंगला आहे. त्‍यांनी या वर्षी 5.58 लाख रुपये टॅक्स भरला आहे. तर 32 हजार रुपये मालमत्ता कर भरला आहे.