शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वार्ता|

शबनम मौसीला चांदीची नावड

मध्य प्रदेशातील खजुराहो मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेल्या शबनम मौसी या तृतीयपंथीय आमदाराकडे लाखोंची संपत्ती आहे. पण चांदीच्या दागिन्यांचा सोस नाही.

चांदीऐवजी सोने चांगले, असे तिचे मत आहे. म्हणूनच तिच्याकडे ८५ तोळे सोने आहे. त्या तुलनेत चांदी फक्त दोनशे ग्रॅम आहे.

मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील सोहागपुर विधानसभा मतदारसंघातून शबनम मौसी १९९८ मध्ये आमदार म्हणून निवडून आली. देशातील ती पहिलीच तृतीयपंथीय आमदार होती. ४८ वर्षांच्या शबनम मौसीला आता लोकसभेत पोहोचायचे आहे. बघूया, ती विजयी होते का ते.