शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वार्ता|
Last Modified: मुंबई , शनिवार, 28 मार्च 2009 (19:31 IST)

शिवसेनेच्या दोन उमेदवारांची घोषणा

शिवसेनेने राज्यात राहिलेल्या दोन जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने कोल्हापूरहून विजय शामराव देवाने यांना तर हातकणंगल्याहून शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी ही माहिती दिली.

कोल्हापूरहून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजयराव महाडिक सेनेत येणार अशी चर्चा होती. मात्र, त्यांना सेनेला झुलवत ठेवत राष्ट्रवादीच्याच घड्याळाचे काटे घट्ट धरून ठेवले आहेत. त्यामुळे सेनेला देवाने यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. हातकणंगलेहून शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही सेनेला ठेंगा दाखविला. शेट्टी यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे येथे रघुनाथदादांना पाठिंबा देण्यात आला.