सुषमा स्वराज यांचा 'यू टर्न'
भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहूमत मिळण्याची शक्यता अंधुक आहे, असे विधान करून अडचणीत आलेल्या भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी आज घेऊन 'रालोआ'ला बहूमत मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, असा 'यू टर्न' घेतला आणि आपले कालचे विधान माध्यमांनी संदर्भ सोडून दाखविल्याचे म्हटले. श्रीमती स्वराज यांनी विदिशा मतदारसंघासाठी येथून आज उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमचा विजय पक्का आहे. सरकारही आमचेच बनेल असा दावा केला.