सुषमा स्वराज यांच्या विजयाचा मार्ग मोकळा
मध्ये प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार सुषमा स्वराज यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. कॉंग्रेसवर उमेदवारी अर्ज रद्द होण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार राजकुमार पटेल हे रिंगणातून बाहेर झाले आहेत. राजकुमार पटेल यांनी नामांकन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी मूळ ए कॉपी अर्जाच्या जागी त्याची छायांकित प्रत दिल्याचे जिल्हाधिका-यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे मूळ अर्ज आणण्यासाठी गेलेले पटेल वेळेच्या आत अर्ज आणू न शकल्याने बाद झाले आहेत. सोमवारी अर्ज पडताळणीनंतर त्यांना बाद ठरविण्यात आले आहे.