अडवाणी उद्या उमेदवारी अर्ज भरणार
वरिष्ठ भाजपा नेता लालकृष्ण आडवाणी आपल्या गांधीनगर मतदार संघातून आठ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम रुपाला उपस्थित असतील. याच दिवशी आडवाणी अहमदाबादमध्ये भाजपच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन करतील.