शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वार्ता|

अमरसिंह यांची 'सपा' सोडण्याची धमकी

समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह यांनी आज पक्ष सोडण्याची धमकी देऊन खळबळ माजवली. पक्षातील नेते मोम्मद आझम खान यांच्यासंदर्भात पक्षाची भूमिका मवाळ राहिल्यास आपण पक्ष सोडून देऊ, असा इशारा अमरसिंह यांनी आज दिला.

स्टुडंट इस्लामिक फेडरेशन ऑफ इंडियातर्फे (सिफी) आयोजित एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. खान हे आपल्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर करीत आक्रमक पवित्रा घेऊन आहेत. पण सहनशीलतेचीही सीमा असते. पक्ष त्यांच्याशी समझौता करण्याचा प्रयत्न करूनही ते त्याला बधलेले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यासंदर्भात पक्षाने काही विचार करायला हवा, असे अमरसिंह म्हणाले.