शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

टायटलरच्या उमेदवारीचा पुनर्विचार

शिख विरोधी दंगातून क्लिन चीट मिळालेल्या जगदीश टायटलरवर पत्रकाराने बूट फेकल्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्या उमेदवारीवर पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहे.

1984 सालच्या दिल्लीतील शीख दंगल प्रकरणातील आरोपी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना सीबीआयने क्लिन चिट दिल्याचा निषेध करत एका शीख पत्रकाराने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या दिशेने जोडा भिरकावला. आता या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी टायटलर यांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्यात येणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.