शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वार्ता|
Last Modified: नागपूर , शनिवार, 28 मार्च 2009 (19:40 IST)

नागपूरहून मुत्तेमवार, पुरोहितांचे अर्ज दाखल

नागपूरहून येत्या १६ एप्रिलला होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी कॉंग्रेसतर्फे विलास मुत्तेमवार व भाजपतर्फे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला.

याशिवाय माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक यांनीही रामटेकमधून अर्ज दाखल केला. मुत्तेमवार यांना नागपूरचे चौथ्यांदा प्रतिनिधित्व करण्यासाठी येथून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी येथून ९८, ९९ व २००४ मध्ये निवडणूक लढवली होतीय यापूर्वी ते चिमुरमधून निवडून गेले आहेत.

भाजपचे पुरोहित सहाव्यांदा या निवडणुकीत उतरत आहेत. पुरोहित यापूर्वी तीन वेळा ही निवडणूक जिंकले आहेत. १९८४ व ८९ मध्ये ते कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. यानंतर ९१ व ९६ मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढली. यात पहिल्यांदा ते जिंकले. नंतर मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसर्‍यांदा पराभवानंतर त्यांनी भाजप सोडून विदर्भ राज्य पार्टीची स्थापना केली. त्या पक्षाच्या जोरावर त्यांनी २००४ मध्ये निवडणूक लढवली. पण त्यांना पराभूत व्हावे लागले. याशिवाय पुरोहित १९९९ मध्ये कॉंग्रेसच्या तिकीटावर रामटेकमधूनही पराभूत झाले आहेत.

यावेळी वासनिक रामटेकमधून लढत आहेत. यापूर्वी ते ८४, ९१, ९८ मध्ये बुलढाण्याहून विजयी झाले होते. मात्र, ८९, ९६ व २००४ मध्ये त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले होते. वासनिक पी. व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये मंत्री होते.

बुलढाणा मतदारसंघ २००४ पर्यंत राखीव होता. यावेळी त्याचे आरक्षण काढले आहे. रामटेकमधून कृपाल तुमाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही जागा शिवसेनेने स्वतःकडे राखली आहे. मात्र ही जागा राखीव झाल्याने शिवसेनेने उमेदवार बदलला आहे.