Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 4 एप्रिल 2009 (18:41 IST)
परेश रावल करणार भाजपचा प्रचार
लोकशाहीच्या महाकुंभमेळ्यात पडद्यावरच्या सिनेकलावंतांनाही उडी घेतली आहे. या यादीत आता परेश रावल यांचेही नाव जोडले गेले आहे. ते भाजपसाठी गुजरातमध्ये प्रचार करणार आहेत.
ते म्हणाले, की मी लवकरच सूरत, बडोदा व अहमदाबाद येथे भाजपसाठी प्रचार करेन. अभिनेता दर्शन जरीवाला, अपरा मेहता व मनोज जोशी यांच्यासह गुजरातच्या विविध भागात प्रचारासाठी दौरा करेन. राजकारणात मात्र येणार नाही हे त्यांनी ठामपणे सांगितले.
निवडणुकीत उतरण्यात आपल्याला रस नाही. अभिनय हाच माझा प्रांत आहे हे सांगून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र यांच्यामुळे आपण हा प्रचार करत नसून त्यांनी राज्यात केलेल्या कामामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपने हेमामालिनी, धर्मेंद्र व विनोद खन्ना यांना तर कॉंग्रसने शाहरूख खान, सलमान खान, गोविंदा व प्रीती झिंटा यांना प्रचारात उतरवले आहे.