मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

भाजपची सत्ता आल्यास पाकमध्ये सैन्य- राजनाथ

मतांसाठी भाजपने आता पाकिस्तानशी युद्ध खेळण्याचा डाव मांडला आहे. भाजपची सत्ता केंद्रात आल्यास दहशतवाद चिरडण्यासाठी पाकिस्तानात सैन्य घुसवू असे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाची परवानगी मिळाल्यानंतरच हे पाऊल उचलू हे सांगून 'सावध' भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

भाजप सत्तेत आल्यास दहशतवाद चिरडण्यासाठी भारतीय लष्कराची मदत हवी काय असे पाकिस्तानला विचारण्यात येईल. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास ठीक. अन्यथा, यासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाऊन पाकिस्तानात सैन्य पाठविण्यासाठी त्यांची परवानगी घेतली जाईल, असे राजनाथसिंह म्हणाले.

अर्थात, पाकिस्तानने स्वतःहून दहशतवाद्यांवर कारवाई करावी आणि आपल्या देशात असलेले त्यांचे जाळे उध्वस्त करावे हीच आमचीही अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. कॉंग्रेसचे सरकार दहशतवादाला आळा घालण्यात साफ अपयशी ठरल्याचे त्यांनी मुंबई हल्ला व देशातील इतर दहशतवादी घटनांचे उदाहरण देऊन सांगितले.