मी म्हातारी दिसते काय?- प्रियंका गांधी
कॉंग्रेसची संभावना सव्वाशे वर्षांची म्हातारी अशी करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आज कॉंग्रेसच्या तरूण तुर्क नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले. मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, 'मी तुम्हाला म्हातारी वाटते, का असा प्रतिप्रश्न करून त्यांनी मोदींच्या टीकेची वासलात लावली. बंधू राहूल गांधींच्या प्रचारासाठी प्रियंका येथे आल्या. त्यांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. गांधी कुटुंबिय नेहमीच अमेठीतील लोकांबरोबर असेल. अमेठीच्या जनतेने इतकी वर्षे साथ दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले. अमेठीच्या विकासासाठी राहूल घेत असलेल्या मेहनतीबद्दलही त्यांनी यावेळी भाष्य केले. कॉंग्रेस सव्वाशे वर्षांची म्हातारी- मोदी