शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वेबदुनिया|

मुंबईत आज युतीची जाहीर सभा

लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर भाजप- शिवसेना युतीची जाहीर सभा रविवारी, 5 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता येथील शिवतीर्थ मैदानावर होणार आहे. यावेळी राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्‍ण अडवाणी आणि शिवसेनेचे कार्याध्‍यक्ष उध्‍दव ठाकरे यांचे जाहीर भाषणे होतील. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे या सभेत थेट संवाद साधणार आहेत.

या सभेसाठी शिवतीर्थ मैदानावर भव्‍य व्‍यासपीठ उभारण्‍यात आले असून कडेकोट सुरक्षा व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.