मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

मोदी, मायावती, प्रियंकांच्या आज सभा

लोकसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे देशातील नेत्यांनी आपल्या कामाचा आवाका वाढवण्‍यास सुरुवात केली आहे.

देशातील विविध पक्षांनी आपल्या प्रचाराला जोरदार प्रारंभ केला असून, आज भाजप नेते नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये प्रचारसभा घेत आहेत.

दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांची गाजीपुर,आणि वाराणसीत सभा होत आहे. ‍कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी आज अमेठी दौर्‍यावर असून, त्यांची येथे आज सभा होत आहे.