रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. लव्ह कोटेशन
Written By वेबदुनिया|

असा पेला ‘संसाराचा गाडा’

WD
नवीन लग्न झाल्यानंतर जोडीदाराला खूश करण्‍याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. किंवा लग्नापूर्वीही आपण हा प्रयत्न केलेलाच असतो. परंतु जसे-जसे आपण कामात गुंतत जातो. नात्यांतील दुरावा वाढत जातो. त्याला काम महत्वाचे वाटू लागते, तर तिला कुटुंब व प्रेम महत्वाचे असते. त्याला बॉसची मर्जी राखायची असते, तर तिला वाटते नवर्‍याचे आपल्यावर प्रेमच नाही. अशा सार्‍या भानगडीत नवरा-बायकोतील प्रेम केव्हा कमी झाले हे एकमेकांनाच कळत नाही.

नात्यांतील दुरावा कमी करायचा असेल तर दोघांनीही एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. अशा प्रसंगी कामातून थोडा वेळ काढत एकमेकांना आवडणार्‍या गोष्‍टी केल्या की झालं. मग कसला राग, कसला रुसवा आणि कसला दुरवा.

WD
आपल्या नवरा / बायकोला पटवण्‍याचे काही फंड

1. बायकांना फुलांचे प्रचंड वेड असते. त्यामुळे नवरोबांनी कधी न सांगता बायकोला एखादा गरजा, निशीगंधाची फुलं किंवा एखादे सुंदर गुलाबाचे फुल द्यावे.

2. नवर्‍याने आपल्याला काहीतरी सरप्राईज गिफ्ट द्यावे अशी बायकांची इच्छा असते, त्यामुळे आठवड्यात किंवा महिन्यात अशा प्रकारचे एखादे गिफ्ट द्यायला काय हरकत आहे?

3. नवर्‍याने आपल्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करावी अशी बायकांची इच्छा असते. ऑफिसच्या कटकटी घराबाहेरच ठेवत जोडीदाराने आपल्याला रात्री भरभरुन बोलावे अशी बायकोची इच्छा असते, तेव्हा ऑफिसकाम विसरत कधी-कधी स्वत:हून विषय काढत बायकोशी मनसोक्त गप्पा कराव्यात.

4. आठवडाभर काम केल्यानंतर एक दिवस विकली ऑफ मिळत असतो, तो कुठेतरी आऊटिंगला घालवण्‍याची बायकांची इच्छा असते. त्यांच्या या इच्छेचा आदर करत कुटुंबासह कुठेतरी छान सहल महिन्यातून एकदा काढायला काय हरकत आहे?

5. कुटुंबात कोणती अडचण असेल तर आपल्या नवर्‍याने जबाबदारी घेत ती अडचण दूर करावी अशी बायकांची इच्छा असते. आपलेच कुटुंब असल्याने बायकोची ही इच्छा पूर्ण करण्‍याचा प्रयत्न करावा.

6. आठवडाभर काम केल्यानंतर नवरा थकून घरी येत असतो, घरी आल्यावर आपल्या डोक्याचा ताप कमी होईल अशी भाबडी आशा त्याला असते, त्यामुळे घरी आल्याआल्या त्याच्या पुढ्यात बायकांनी अडचणींचा पाढा वाचू नये.

7. दिवसभरातील कटकटींमुळे पुरुष जाम वैतागलेले असल्याने त्यांना आल्याआल्या बोलण्‍यास मागे लागू नये.

8. आपल्यालाही पुरुषांच्या अडचणी समजतात, त्यांच्यातून मार्ग काढण्‍यासाठी आपण काय करु शकतो, याची चर्चा केलेली पुरुषांना अधिक आवडत असते, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना नेहमीच त्यांच्यावर आपला विश्वास असल्याचे सांगावे.

9. जोडीदाराशी नेहमीच प्रेमाने वागावे, राग, रुसवे, फुगवे प्रत्येकालाच असतात, ते असावेतही, पण त्यांना मर्यादा हवी. त्यांना शब्दांची, वेळेची व नात्यांची मर्यादा गरजेची आहे.

10. पुरुषांना आपल्या कामात अधिक ढवळा-ढवळ केलेली आवडत नसते, त्यामुळे बायकांनी त्यांना फुकटचे सल्ले देणे टाळावे. हा पण आपल्या जोडीदाराचे यामुळे जर नुकसान होत असेल तर आपल्या मतावर ठाम रहात, त्यालाही तो विषय निट समजावून सांगावा.

संसाराचा गाडा हा दोघांनी हाकायचा असतो. एक दोर जरी सुटला तरी गाडा उलटण्‍याची शक्यता असते. ऐकमेकांना समजून घेणे म्हणजेच ‘संसार’ होय.