शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (16:54 IST)

विधानसभा निवडणुकीपूर्व अजित पवारांना मोठा धक्का, हे नेते करणार शरद पवार गटात प्रवेश

ajit panwar
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या गटातील नेते बाबाजानी दुर्रानी हे शरद पवार गटात शामिल होण्याचे संकेत मिळत आहे. शुक्रवारी संभाजीनगर दौऱ्यावर असताना बाबाजानी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. 

राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते अजित पवारांवर नाराज सल्याचा दावा बाबाजांनीनी केला आहे. बाबाजानी हे सध्या अजितपवार गटाचे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष व विधान परिषदेचे सदस्य आहे. त्यांचा कार्यकाळ काही दिवसांनी संपणार आहे. आज त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे वृत्त मिळत आहे. . 

राष्ट्रवादीत फूट पडल्यावर दुर्रानी हे शरदपवारांची साथ सोडून अजित पवारांसह गेले. ते विधानपरिषदेचे आमदार असून त्यांनी पुन्हा विधानपरिषदेचे तिकीट मागितले. त्यांना संधी दिली नाही त्यांच्या ऐवजी परभणीतील राजेश विटेकर हे विधानपरिषदेवर निवडून आले. शरद पवारांनी त्यांना 2012 आणि 2018 मध्ये विधान परिषदेवर आमदार केलं. आता पुन्हा त्यांनी शरद पवारांचा पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 
Edited By- Priya Dixit