शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (11:29 IST)

शिवसेनेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली, एकनाथ शिंदे लढवणार या जागेवरून निवडणूक

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांनी उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली असून भाजप आणि मनसेपाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार विदर्भातून 5 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
 
तर मिळालेल्या माहितीनुसार कोपरी पाचपाखरी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार आहे. विदर्भात आशिष जैस्वाल यांची रामटेकमधून उमेदवारी करण्यात आली असून बुलढाणामधून संजय गायकवाड, दरियापूरमधून अभिजीत अडसूळ, भंडारामधून नरेंद्र भोंडेकर आणि दिग्रसमधून संजय राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
तसेच महायुतीमध्ये अजून जागावाटप जाहीर झालेले नाही. पण भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी एक उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजप आणि शिवसेनेपाठोपाठ अजित पवारांची राष्ट्रवादी देखील यादी जाहीर करू शकते. 

Edited By- Dhanashri Naik