शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र अर्थसंकल्प
Written By
Last Updated :मुंबई , शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:16 IST)

अर्थसंकल्पावर आशिष शेलारांनी खोचक टीका; म्हणाले, पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट, पचपचीत…

ashish shelar
राज्य सरकारने आज विधानसभेत अर्थसंकल्पजाहीर केला आहे. अर्थमंत्री अजित पवार = यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अधिक योजना असल्याचे दिसत आहे. मात्र भाजप नेते आशिष शेलार यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.
 
राज्याच्या अर्थसंकल्पावर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (=यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी टीका केली आहे.
राज्य सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प हा पंचसूत्रीचा विकासाच्या आधारावर नसून तो मांडल्यानंतर लक्षात येते की, पानचट,पचपचीत आणि प्रतिगामी असा अर्थसंकल्प आहे.
हा स्व-राज्याचा अर्थसंकल्प वाटत असून स्व-हिताचा अर्थसंकल्प आहे.आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप काही केलं,असं सांगितले गेले पण प्रत्यक्षामध्ये आर्थिक पाहणी अहवालात बघितलं ही,
कोरोना काळामध्ये शेतकरी खासगी सावकाराकडे वळला हे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चकार शब्द सुद्धा या अर्थसंकल्पात काढला नाही अशी टीका शेलारांनी केली आहे.
अर्थसंकल्प राज्याचा पण जिल्हा नियोजनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे दिसते आहे. अर्थसंकल्प पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे अशा पद्धतीचा आहे. पुणे (Pune) जिल्ह्यामधील सगळ्या प्रकल्पांना निधी दिला आणि मुंबईला मात्र भोपळा असे चित्र आहे.
कुणाच्या विरोधात आम्ही नाही पण पुणे जिल्ह्यामध्ये जर मेट्रोच्या विकासाची गती वाढवली जाते तर मुंबईतल्या मेट्रो कारशेडचे काय ? याबाबत काहीच बोलले जात नाही.इंद्रायणी मेडिकल सीटी बनविण्याची घोषणा केली.
300 एकर जागेत उभी केली जाणार आहे. पुण्यामध्ये जागा बघून मेडिकल सीटी आणली जातेय की पुण्यासाठी मेडिकल सिटी आणली जातेय?याच्यावर सुद्धा मनात शंका निर्माण होते. या पद्धतीचे चित्र आहे.
म्हणून एकंदरीतच बघितलं तर इतर मागासवर्गीय आयोगाला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केलंय. निधीची तरतूद दिसतच नाही. म्हणून हा अर्थ संकल्प स्वराज्या पेक्षा स्व हिताचा विचार करणारा आहे अशीही टीका आशिष शेलार यांनी केली आहे.