शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर|

पाच‍गणी

पठारांच्या प्रदेशात

पाचगणी महाबळेश्वरपासून जवळच असलेले पाचगणी हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. पाच लहान डोंगरांमुळे या भागाला पाचगणी असे नाव पडले. तिबेटच्या पठारानंतर आशियातील सर्वांत उंचीवरचे हे पठार आहे. येथे वर्षभर पर्यटकांची ये- जा असते.

पर्यटकांमध्ये पाचगणी विशेष प्रसिद्ध आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला या पठाराचे विशेष आकर्षण असल्याचे दिसते. दर्‍या -खोर्‍यांनी नटलेल्या, सुंदरतेचा वरदहस्त लाभलेल्या या भागात चित्रीकरणासाठी लोकेशन्सची कमतरता भासत नाही. वर्षभर येथे कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचे शूटिंग चालू असते.

पाचगणी बोर्डिंग स्कूलसाठीही प्रसिध्द आहे. येथील टेबल लँड, पार्सी पॉईंट, सिडनी पॉईंट, पाचगणीच्या गुहा, किडीज पार्क पाहण्यासारखे आहे. जवळच कमलगडही आहे. पाचगणीत पारशी व ब्रिटीश लोकांचे बंगले खूपच आकर्षक आहेत.

जाण्याचा मार्ग ः

पुण्यापासून पाचगणी शंभर किलोमीटरवर आहे. महाबळेश्वरपासून जवळच असल्यामुळे तेथे जाणारा पर्यटक पाचगणीला महाबळेश्वरला आल्यानंतर पाचगणीला भेट दिली नाही, असे कधी होत नाही.