किल्ले हडसर

killa hadsar
Last Modified शनिवार, 10 जानेवारी 2015 (14:44 IST)
हडसर किल्ल्याची प्रवेशद्वार म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक नमुनाच आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाजाची दुक्कलं, नळीत खोदलेल्या पायर्‍या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे पाहणे म्हणजे दर्गशास्त्रातील एक वेगळेच दुर्गवैशिष्ट्य आहे. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटेपैकी एक टकेडीवर जाते तर दुसरी येथील प्रवेशद्वारापाशी. दुसर्‍या दरवाजातून वर आल्यावर समोरच पाण्याची टाकी आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. जवळच असलेल्या उंचवट्याच्या दिशेने जाऊन डावीकडे वळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात
कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. त्यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत. येथून उजवीकडे तलाव आणि महादेरू मंदिर आहे. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून, सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाड्यात गणेशमूर्ती गरुडमूर्ती तर एकात हनुमानाची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर सुरेख दिसतो. समोरच चावंड, नाणेघाट, शिवनेरी, भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर न्याहाळता येतो.

जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर गावी पोहोचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते, तेथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठरावरील शेतामधून चालत गेल्यावर 15 मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात आपण बृरुजापाशी पोहोचतो. येथील महादेव मंदिरात 4 ते 5 जणांना राहता येते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपणच करावी लागते.

राधिका बिवलकर


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन
हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं वयाच्या 88 ...