पैठण

उमेश अनपट|औरंगाबादपासून दक्षिणेकडे ५६ किलोमीटरवर तालुका आहे. हा तालुका गोदावरी नदीच्‍या तीरावर वसला आहे. याला मराठवाड्‍याचे प्रवेशद्‍वार म्‍हणूनही संबोधतात. या तालुक्‍याला ऐतिहासिक व नैसर्गिक असे महत्‍व आहे. येथे एकनाथ महाराजांमुळे पैठण प्रसिद्ध आहे. शिवाय पैठणी साड्‍यांचे निर्मिती केंद्रही येथेच आहे. गोदावरी नदीवरील सर्वंत मोठे जायकवाडी धरण येथेच आहे. याच धरणाच्या पाण्यावर ज्ञानेश्‍वर उद्‍यान आहे.

पैठणला एकनाथ महाराजांची समाधी आहे. ही समाधी गोदावरी तीरावर एका आकर्षक व विलोभनीय मंदिरात आहे. या ठिकाणी षष्ठीच्‍या दिवशी नाथषष्ठी नावाने मोठी यात्रा भरते. महाराष्‍ट्रातील वारकरी संप्रदाय या वेळी मनोभावे येथे उपस्‍थित असतो. येथेच ज्ञानेश्‍वर महाराजांनी रेड्‍याच्‍या मुखातून वेद वदवून घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते.
पैठण जगप्रसिद्ध पैठणी साड्‍यांसाठी प्रसिद्‍ध आहे. या साड्‍यांना आकर्षक असा जरतारी पदर असतो. या साडीमध्‍ये स्त्रीचे सौंदर्य अतिशय खुलून दिसते. या साड्‍या हातावर विणल्‍या जातात. येथील पैठणी हातमाग केंद्राला भेट देऊन थेट तेथूनच पैठणी खरेदी करू शकतो.

प्रसिद्ध जायकवाड धरण पाहणे हा अतिशय रम्य अनुभव आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्याला आता नाथसागर असे संबोधततात. या धरणाचे वैशिष्ट्‍य म्‍हणजे ते सपाट जमिनीवर आहे. अशा प्रकारचे ते आशिया खंडातील केवळ दूसरे धरण आहे. शिवाय त्याचे बांधकाम मातीत केले आहे. धरणाची भिंत जवळजवळ पंधरा किलोमीटर लांबीची आहे. धरणाला सत्‍तावीस मोर्‍या आहेत. या धरणाला मराठवाड्‍याला अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. या धरणावर मासेमारीही चालते. धरणातील माशांची चव आपल्‍याला येथील हॉटेलमधून चाखायला मिळते. या धरणावर संध्‍याकाळ घालवणे हा विलोभनीय अनुभव आहे. धरणाच्‍या भिंतीवर उभा राहून धरणातील पाणी पाहिल्‍यास या धरणाची दोन रूपे आपणास पहायला मिळते. एक रूप अतिशय मनमोहक आणि दुसरे आक्राळ विक्राळ. हे धरण पहाताना एखाद्‍या सागराच्‍याच किनारी असल्‍याचा आपल्‍याला भास होतो. संध्‍याकाळी क्षितिजापलिकडे डुंबणार्‍या सुर्याची क‍िरणे समुद्राच्‍या पाण्‍याला सोनेरी करून टाकतात. हे दृश्‍य अतिशय मनमोहक दिसते.
जवळच ज्ञानेश्वर उद्यान आहे. या उद्यानाचे वैशिष्‍ट्‍य म्हणजे ते म्‍हैसूरच्‍या वृंदावन गार्डनची प्रतिकृती आहे येथे लहानांपासून मोठ्‍यांपर्यंत सर्वांच्‍याच मनाला विरंगुळा मिळतो. मनमोहक फुलांनी युक्‍त असा बगिचा येथे आहे. लहानग्यांना खेळण्‍यासाठी खेळ उद्यान आहे. मुलांसाठी आगगाडी आहे. रंगीबिरंगी कारंजे आहेत. पोहण्‍याचा आनंद लुटण्‍यासाठी धबधबाही आहेपाण्‍याच्‍या तालावर नाचणारे पाणी पहाण्‍याचा एक वेगळाच आंनंद आहे. येथे आल्यानंतर आपण आपला थकवा विसरून उत्साह, आनंद मिळवतो.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...

थेंबे थेंबे तळे साचे...शाहरुखचं मराठीत ट्विट

थेंबे थेंबे तळे साचे...शाहरुखचं मराठीत ट्विट
करोनाच्या लढाईत आपण एकत्र आहोत, अशी धीर देणारं‍ ट्विट बॉलीवूड बादशाह शाहरुख खानंने केलं ...

हा फोटो का होतोय व्हायरल, कोणत्या चित्रपटाचा आहे जाणून घ्या

हा फोटो का होतोय व्हायरल, कोणत्या चित्रपटाचा आहे जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशातील जनतेशी संवाद साधून 5 एप्रिल रोजी ...

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार
अभिनेता रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ...

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...