दुष्काळग्रस्तांसाठी मासिक भत्ता
पंचायत समिती सदस्य व पदाधिकार्यांचा मासिक भत्ता दुष्काळग्रस्त निधीसाठी द्यावा व सदस्यांच्या मागणीला पदाधिकार्यांनी नकार दिला. यावर दोन्ही गटाचे सदस्य व दोन्ही गटाच्या पदाधिकार्यांची दुफळी होवून यावेळची पं.स. मासिक सभा वेगळ्याच विषयाने गाजली. सभापती वनिता कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक सभा झाली. यावेळी या महिन्याचा मासिक भत्ता हा सर्वांनी दुष्काळग्रस्त जनतेला देण्याते आवाहन राजेश पवार यांनी केले. त्याला आ. विक्रमसिंह पाटणकर व माजी आ. शंभूराज देसाई या दोन्ही गटाच्या सदस्यांनी तात्काळ आपली भत्ता पाकीटे देण्याचे मान्य केले.