बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: कल्याण : , शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2009 (12:36 IST)

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा दारूण पराभव

कल्याण-डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा दारूण पराभव झाला असून कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण मधून मनसेचे प्रकाश भोईर व रमेश पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. डोंबिवलीचा गड भाजपाने राखला असून भाजपाचे रविंद्र चव्हाण विजयी झाले आहेत.

कल्याणमध्ये शिवसेनेला धक्का
डोंबिवली जवळ असलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे रमेश म्हात्रे व कल्याण पूर्वेमध्ये शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे सहज विजयी होतील असे वाटत असतानाच काँग्रेसमधून मनसेत दाखल झालेले रमेश रतन पाटील यांनी ग्रामीणमध्ये जोरदार लढत देऊन विजयश्री खेचून आणली.

कल्याणपूर्वेमध्ये अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांना जोरदार धक्का देत त्याचा पराभव केला. कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीचा दारुण पराभव झाला आहे. डोंबिवली भाजपा व अंबरनाथ शिवसेना या दोनच जागा युतीला मिळाल्या. तर मनसेला कल्याण ग्रामीण व पश्चिम या दोन जागा मिळाल्या. कल्याण पूर्वेमध्ये अपक्ष्स तर उल्हासनगरमध्ये भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना १ व भाजपा २, मनसे १, राष्ट्रवादी काँग्रेस १ व अपक्ष १ अशी विभागणी झाली आहे. त्यामुळे युतीचा बालेकिल्ला ढासळण्याची चिन्हे आहेत.