शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By नितिन फलटणकर|

निवडणूक कामाला जुंपल्यामुळे प्राध्यापकांची पंचाईत

नागपूर (हिं.स.) सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी ४५ दिवस संप पुकारल्यानंतर अभ्यासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आली असली तरी मध्येच आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामावर या प्राध्यापकांना जुंपण्यात आल्याने अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.

२४ जुले ते २६ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वच प्राध्यापक संपावर होते. संपाच्या या कालावधीत बुडालेला अभ्यासक्रम २२ फेबु्रवारीपर्यंत भरून काढायचा असल्याने राज्यभरातील सर्वच महाविालयांतील दिवाळीची सुट्टी एक महिन्याऐवजी केवळ पाच दिवसच ठेवण्यात आली आहे. कारण, अभ्यासक्रम भरून काढल्याशिवाय संपकाळातील वेतन न देण्याचा शासनाचा निर्णय आहे.

अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने विार्थ्यांचे होणार्‍या शैक्षणिक नुकसानासाठी महाविालय आणि विापीठांनाच जबाबदार धरण्यात येणार असून, कारवाई करण्याचा इशाराही शासनाने दिला आहे.

प्राध्यापकांना शिकविण्याचा जेमतेम मूड आला असताना विधानसभा निवडणुकीच्या कामावर त्यांना तैनात करण्यात आले. या प्राध्यापकांना निवडणूक केंद्रांवर केंद्रांधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीचे काम करायचे की विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करायचा, या चिंतेने प्राध्यापकांना ग्रासले आहे.