आगामी मुख्यमंत्री वंचित आघाडीचाचः प्रकाश आंबेडकर
"आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल," असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
भविष्यात वंचित बहुजन आघाडी राज्यातील विरोधी पक्ष असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
"आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आम्ही आघाडी करण्यास उत्सुक आहोत. अद्यापही काँग्रेसला आमचे दरवाजे मोकळे आहेत. पण 144 पेक्षा अधिक जागा आम्ही काँग्रेसला देणार नाहीत. याबाबतची अंतिम भूमिका पुढील आठवड्यात आपण जाहीर करणार आहोत," असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘माझी चूक असेल तर कायदेशीर शिक्षा करा’: प्रकाश आंबेडकरांवर टीका केल्यावरून मारहाण झालेले वृद्ध
"आमच्या संभाव्य आघाडीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार नाही. कारण राष्ट्रवादीची मते काँग्रेसला परावर्तित होत नसल्याचं काँग्रेसवालेच बोलतात. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे काहीच कारण नाही," असंही ते पुढे म्हणाले.