मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (14:05 IST)

Maha Shivratri : कर्जापासून मुक्तीसाठी शिवरात्रीला जपा हे 17 सोपे शिव मंत्र

महाशिवरात्री आणि नंतर मासिक शिवरात्रीला सूर्यास्‍तावेळी आपल्या घरात बसून आपल्या गुरुदेवाचे स्मरण करुन महादेवाचे स्मरण करावे आणि नंतर या 17 मंत्रांचा उच्चार करावा. 'शिवच गुरु आहे गुरुच शिव आहे' म्हणून गुरुदेवाचे स्मरण देखील करावे.
 
ज्यांचा गुरुदेवात दृढ विश्वास आहे त्यांनी गुरुदेवाचे स्मरण करत-करत मंत्र बोलावे. ज्यांच्यावर कर्ज आहे आणि फेडणे अवघड जात असेल त्यांनी शक्योतर महादेवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावावा आणि मंत्र उच्चारित करावे. शक्य नसल्यास घरी बसून देखील मंत्र उच्चारण करणे प्रभावी ठरेल-
 
1) ॐ शिवाय नम:
2) ॐ सर्वात्मने नम:
3) ॐ त्रिनेत्राय नम:
4) ॐ हराय नम:
5) ॐ इंद्रमुखाय नम:
6) ॐ श्रीकंठाय नम:
7) ॐ सद्योजाताय नम:
8) ॐ वामदेवाय नम:
9) ॐ अघोरहृदयाय नम:
10) ॐ तत्पुरुषाय नम:
11) ॐ ईशानाय नम:
12) ॐ अनंतधर्माय नम:
13) ॐ ज्ञानभूताय नम:
14) ॐ अनंतवैराग्यसिंघाय नम:
15) ॐ प्रधानाय नम:
16) ॐ व्योमात्मने नम:
17) ॐ युक्तकेशात्मरूपाय नम:
या मंत्राचे उच्चारण करुन आपल्या ईष्ट व गुरुला प्रणाम करुन शिव-गायत्री मंत्र बोलावे-
 
'ॐ तत्पुरुषाय विद्महे। महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्।।'
 
ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे, त्यांनी महादेवाला नमन करुन 17 वेळा हे देखील म्हणावे की - माझ्या डोक्यावरील हा भार उतरवावा, मी निर्भर जगत आपली भक्ती करत राहू आणि केवळ समस्याची आठवण न काढत राहू.