मकर संक्रांतीला सूर्याचे राशी परिवर्तन, 12 राशींवर प्रभाव
सूर्याने धनू रास सोडून मकर राशी प्रवेश केल्यावर मकर संक्रांती सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्याची उत्तरायण गती प्रांरभ होते. म्हणून याला उत्तरायणी नाव देखील आहे. जाणून घ्या राशी अनुसार संक्रांतीचा आपल्यावर प्रभाव...
मेष : मान-प्रतिष्ठेत वृद्धी आणि लाभाची संधी मिळेल.
वृषभ : वाद आणि मानसिक कष्ट याची शक्यता नाकारता येणार नाही.
मिथून : कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये कष्ट आणि धनाचे अपव्यय होण्याची शक्यता आहे.
कर्क : दांपत्य संबंधांत विवाद आणि मान हानी होऊ शकते.
सिंह : शत्रूवर विजय प्राप्ती आणि आजारापासून मुक्ती मिळेल.
कन्या : उच्च अधिकार्यांकडून ताण मिळण्याची संभावना आहे. प्रवास करताना जपावे.
तूळ : संपत्ती संबंधी प्रकरणात सतर्क राहणे गरजेचे आहे.
वृश्चिक : प्रगतीची संधी आणि आय वृद्धीचे योग आहे.
धनू : धन हानी आणि डोकं व डोळ्यात वेदनांचे लक्षण आहे.
मकर : मान-सन्मानात वृद्धी होईल. लाभाची संधी दिसून येते. धनासाठी प्रयत्न करावे लागतील.
कुंभ : यश-प्रतिष्ठेत वृद्धी. प्रवास-मनोरंजनाचे योग आहे. धन प्राप्तीची संधी मिळेल.
मीन: धन, पदोन्नती आणि मान-सन्मान मिळेल.