शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बाजारभाव
Written By
Last Modified शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (16:16 IST)

सोयाबीनचे भाव वाढूनही शेतकरी खूश नाहीत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सोयाबीनची आवक कमी होत असल्याने मागणी वाढत आहे. शनिवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 10 हजार पोत्यांची आवक झाली होती तर सरासरी दर हा 6 हजार 500 एवढा होता. गेल्या काही दिवसांपासून दर स्थिर असले तरी आवक कमी जास्त होत आहे.
 
सोयाबीनचे भाव पडणार नाहीत तर वाढतील, असा अंदाज आता व्यापारी व्यक्त करत आहेत. परंतु अपेक्षित भाव मिळाल्याशिवाय सोयाबीन विकायचे नाही, असे वातावरण बाजारपेठेत आहे.
 
दिवाळीपासून सोयाबीनचे दर वाढले आहेत आणि आता बाजारात सोयाबीनचे भाव 6 हजारांवर स्थिर आहेत. दिवाळीपूर्वी सोयाबीनचा भाव 4,800 रुपये होता. मात्र सोयाबीनची हजार पोती आवक झाली. जोपर्यंत आम्हाला चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोयाबीन विकणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर काही शेतकऱ्यांचे असेही म्हणणे आहे की, अवकाळी पावसामुळे सोयाबीन विक्रीसाठी आणले जात नाही.
 
सोयाबीनच्या दरात 100 ते 150 रुपयांची वाढ होत आहे. आज फक्त 10 हजार पोत्यांची झाली. आतार्यंत दर वाढले की आवक मोठ्या प्रमाणात होत होती. यामुळे दुसऱ्याच दिवशी दर हे कमी होत होते. बाजारातील हेच सुत्र शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे एक शेतकरी सगळेच सोयाबीन विक्री करीत नाही तर गरजेप्रमाणेच विक्री करीत आहे. अद्यापही इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलेले नाही. 
 
दरवर्षी दिवाळीत 50 हजार ते 60 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असते. सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 
 
दिवाळीपासून दरात सातत्याने वाढ होत होती, मात्र आता गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर आहेत. याशिवाय ढगाळ आकाशामुळे आवक घटत आहे. सोयाबीनचे भाव सध्या स्थिर असले तरी भविष्यातही सोयाबीनचे दर वाढतच राहणार आहेत. याशिवाय प्रक्रिया, उद्योजक आणि मागणी याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणखी काही दिवस वाट पाहिल्यास भाव जास्त मिळतील, असे व्यापारी सांगत आहेत.