1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: नवी मुंबई , गुरूवार, 22 सप्टेंबर 2016 (12:03 IST)

नवी मुंबईत मराठय़ांचा जनसागर

मराठय़ांना आरक्षण व अँट्रॉसिटी कायद्यात सुधारणा यासह इतर मागण्यांसाठी बुधवारी नवी मुंबईतील कोकण भवनवर मराठा समाजाचा जनसागर उसळला. 
 
खारघर मधील सेंट्रल पार्कपासून या मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात झाली. शिस्तबद्ध पद्धतीने महिला, तरुणी व नंतर तरुण असा नियोजन करत मूक मोर्चा सीबीडी-बेलापूरमधील एम. जी. एम. सर्कलजवळ पोहोचला. याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दोन तरुणींनी मोर्चाला संबोधित केले. यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करून दोन तरुणींनी विभागीय कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांना निवेदन सुपुर्द केले. या मोर्चाला अवघा रायगड जिल्हा व नवी मुंबईतील मराठा समाज एकवटला होता. या मोर्चात मोठय़ा प्रमाणात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सहभागी झाले होते.