शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: रविवार, 12 डिसेंबर 2021 (10:29 IST)

दत्त आरती - स्वानंदें आरती दत्ता पाहू डोळां

स्वानंदें आरती दत्ता पाहूं गेले डोळां ।
तंव चराचर अवघा श्रीदत्तस्वलीला ।
विस्मयें दाटला आतां ओवाळूं कैसें ।
देखतें देखणें श्रीदत्तची दिसे ॥धृ.॥
असे आणि नसे हा तो विकल्प जना ।
दत्ता दत्तस्थिति जनीं देखुनी जनार्दना ।
जनी जनार्दनीं निजरूप दत्त ।
एकाजनार्दनीं तेथें अद्वैत नित्य ॥१॥