बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2010
Written By वेबदुनिया|

राहुल गांधी पंतप्रधान बनणार!

- बेजान दारूवाला

PR
PR
प्राचीन पध्दतीने भविष्य कथन करणारे ज्योतिष बेजान दारूवाला यांच्यामते आगामी काळात भारत युवाशक्तीच्या जोरावरी 'सुपरपॉवर' बनणार आहे. 2010 हे नववर्ष भारतासाठी चांगले राहील. कॉग्रसचे सरचिटणीस राहूल गांधी यांच्या कुंडलीत पंतप्रधान बनण्याचे योग आहेत.

1 जानेवारीपासून देशाच्या प्रगतीचा आलेख उंचवणार असून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत वर्चस्व कायम ठेवेल. प्रगतीच्या स्पर्धेत भारत अनेक विकसित देशांना मागे टाकणार आहे. देशातील तळागाळातील लोकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन देशाला पुढे आणण्‍यासाठी ते हातभार लावतील. युवाशक्ती देशाला यशाच्या शिखरावर पोहचविण्यासाठी मोलाचे योगदान देतील. सध्या देशात अतिरेकी कारवायांना ऊत आला आहे. मात्र येत्या दोन वर्षात दहशतवाद कमी होणार आहे.

पाकिस्तान हा आपला शुत्र आहे. मात्र सद्यस्थितीला आपल्याला सर्वाधिग धोका हा चीन कडून आहे. चीनची राशी तूळ असून तिचा भारतावर हल्ला चढविण्याच्या हालचाली सुरू आहे.


प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह याचा ग्रह सूर्य असून तूळ राशी आहे. त्यांचा शनी हा तूळ राशीमधून जात आहे. ग्रह आणि शनी हे ग्रह एकमेंकांचे शत्रू आहे. त्यामुळे थोड्याच दिवसात राहूल गांधी मनमोहनसिंह यांची जागा घेणार आहे.

सोनिया गांधी यांची राशी धनु आहे व राहुल गांधी यांची मिथुन राशी आहे. धनु राशी समोर मिथुन राशी येते. या दोनही राशीसाठी येणारा काळ हा चांगला आहे. राहूल पंतप्रधान बनणार हे त्यांच्या कुंडलीत लिहिले आहे.