2010 मध्ये सावधगिरी महत्त्वाची!
2010
वर्षाची सुरवात ज्योतिष घटनानी होणार आहे. नववर्षांच्या प्रारंभी अर्थात पहिल्याच दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. यंदा सुरू होणारे मलमास 2011 मधील 14 जानेवारीला संपणार आहे. पाच फेब्रुवारीपर्यत शुक्रास्त असल्याने शुभमंगल कार्याला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शहनाईचे गुंजन कानी पडणार नाही. पूजा पाठ करणार्यांसाठी खुशखबर म्हणजे, यंदा अधिकमास आहे. 2010
वर्षाचा पहिला महिना चंद्रग्रहणाच्या नावे आहे. 15 फेब्रुवारी सूर्यग्रहण आहे. 16 डिसेंबरपासून सूर्यने धनुराशीमध्ये प्रवेश केल्याने मलमास सुरू झाला आहे. याचा प्रभाव संपूर्ण एक महिना राहणार आहे. विवाह तसेच शुभ कार्यासाठी हा काळ अशुभ मानला जात असतल्याने या महिन्यात एक ही शुभ कार्य करता येणार नाही. मलमाससह शुक्रास्ताचाही योग आहे. 19 डिसेंबर ते 5 फेब्रुवारी दरम्यान शुक्रास्त रहाणार आहे. त्यामुळे मार्चपर्यंत एकही विवाहाचा मुहुर्त नाही. वर्षांच्या सुरवातीच्या पंधरवाड्यात दोन ग्रहण आल्याने हे वर्ष देशाच्या राजकारणात उलथापालथ करणारे आहे. भ्रष्टाचार वाढण्याचे संकेत आहे तर ब्राह्मण, पुढारी व कलाकारांना हे वर्ष विशेष प्रतिकृल आहे. तूप, तेल, गुळ, पोलाद यांचे दर वाढतील. चंद्रग्रहण हे अनेक देशातून दिसणार आहे.