मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2010
Written By वेबदुनिया|

अमिताभ बच्चन : संमिश्र वर्ष राहील!

ND
सुपर स्टार अमिताभ बच्चनचा वाढदिवस 11ऑक्टोबरचा आहे. बिग बी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अमिताभ यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 ला अलाहाबाद येथे जन्म झाला होता. यांची सूर्य कुंडली कन्या लग्नाची आहे आणि सूर्य कुण्डलीनुसार यांच्या लग्नात सूर्य-बुध-शुक्र आणि मंगळ हे ग्रह आहत. ज्याचा संबंध कलेशी निगडित आहे. द्वितीय भावात तूळचा चंद्र आहे, त्यामुळे यांचा कळ कुटुंबियांकडे जास्त असतो. धनाची भरभराट असून वाणी प्रभावशील असते. गुरू उच्चाचा आहे ज्याने समाजात आदर मिळून मोठ्यांचा स्नेह यांना लाभतो.

सद्या अमिताभ बुधाच्या महादशेतून जात आहे. बुधात शनीचा अंतर 2013 पर्यंत राहील. तसे तर बुध लग्नस्थ असून मंगळ आणि सूर्याच्या प्रभावात आहे. शनी 5 व 6 व्या भावाचा स्वामी असून भाग्य स्थळी आहे. म्हणून लाभ आणि हानी दोघांचा समान योग बनत आहे. जानेवारी पर्यंतचा वेळ त्यांच्यासाठी तणाव आणि संकटाचा आहे.

यंदा बीग बी च्या वाढदिवसापासूनच 'कौन बनेगा करोडपती'चे प्रसारानं सुरू होणार आहे. या प्रोजेक्टबद्दल त्यांच्या चाहत्यांना जेवढ्या अपेक्षा व उमेद आहे, ते कदाचित खरी ठरणार नाही, अर्थात ही पारी पहिल्या सारखी सुपर हिट होणार नाही असे वाटत आहे. येथे अमिताभच्या हाती निराशा येणार आहे.

फेब्रुवारीपासून त्यांचे ग्रह बदलणार आहे. अर्थात एखाद्या स्त्रीच्या साहाय्याने स्थितीत सुधारणा येईल व शुभ कार्य किंवा चित्रपटात यश येण्याची शक्यता आहे. विदेशात एखादे शो केल्याने त्याला धन लाभ आणि साहाय्याचे योग बनत आहे. परिवारात शुभ बातमी मिळू शकते. प्रकृतीकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.

कार्याच्या अनुकूलतेसाठी शिव पूजन केले पाहिजे, बुध आणि शनीला दान केले पाहिजे. तसेच अपंगांना भोजन व वस्त्र दान करायला पाहिजे.