ट्विंकलचा प्रगतीचा आलेख उंचावेल!
- भारती पंडित
सिने अभिनेता राजेश खन्नाची सुकन्या व सुपर स्टार 'सिंग इंज किंग' फेम अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाची ओळख केवळ स्टारची मुलगी व पत्नी एवढीच नसून ती एक स्वतंत्र 'बिझनेस वूमन' आहे.ट्विंकलचा जन्म 29 डिसेंबर 1974 रोजी पुणे येथे झाला होता. सूर्य कुंडलीनुसार ट्विंकल धनु लग्न व मिथुन राशीत जन्मली होती. शनि चंद्रची दृष्टी तिला तांत्रिक जाण व काम करण्याचे बळ देत असते. याच्या बळावरच ट्विंकल 'इंटीरियर डेकोरेटर्स' म्हणून प्रगती पथावर आहे. तिने सुरवातीला चित्रपत्रामध्येही भूमिका साकारल्या होत्या. मात्र त्यात तिचा जम बसला नाही. त्यामुळे तिने 'हट के' मार्ग निवडला व त्यात ती यशस्वी झाली. ट्विंकलमागे 2001पासून शनिची महादशा सुरू आहे. सध्याचा काळ तिच्यासाठी प्रगतीचा काळ आहे. मोठ्या यशाला ती गवसणी घालणार आहे. तिचा पती अक्षय कुमारसोबत ती एक प्रोजेक्ट हाती घेण्याच्या विचारात आहे. तो यशस्वी झाल्यानंतर तिची चांदी होण्याचा योग संभवतो. धार्मिक कार्य ही तिच्या घरात होण्याचे योग आहेत. ट्विंकलला मात्र द्विधा परिस्थितीतून बाहेर निघता येत नाही. त्यामुळे तिचा आत्मविश्वास डगमगतो. याची काळजी तिने घेतली पाहिजे. काही नवीन गोष्टी तिने शिकल्या पाहिजे.