15 जानेवारी 2010 पासून माघ महिन्यास प्रारंभ होत आहे. ज्योतिषशास्त्रात हा महिना धर्म, कर्म व पूजापाठ कण्यासाठी उत्तम असल्याचे सांगितले आहे. माघ महिन्यात सकाळ- संध्याकाळी नदीवर स्नान करून दीन दुबळ्यांना दान केल्याने मोक्ष प्राप्त होत असते.
ज्योतिषाचार्य पं. आनंदशंकर व्यास यांच्या मते माघ महिन्यात तीर्थस्नानाचे महत्त्व आहे. सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून दान केल्याने घरात सुख-शांती नांदत असते. तसेच त्याला मोक्ष प्राप्त होते. विशेषत: माघ महिन्यात ऊबदार कपडे, कांबळ, तूप, सोने, जमीन दान करणे महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय आपल्या यथाशक्तीनूसारही दान केले जाते.