विद्या बालनसाठी शुभ योग
- भारती पंडित
'
पा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून अभिनेत्री विद्या बालन हीने त्यात अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा प्रसिध्दीच्या झोतात आली आहे. 2010 हे नववर्षा विद्यासाठी शुभ योग घेऊन आले आहे. तिचा जन्म 1 जानेवारी 1978 ला पालाहट (केरळ) येथे झाला होता.सूर्य कुंडलीनुसार विद्या धनु लग्न व सिंह राशीत जन्मली आहे. लग्न व राशी यांच्यात मैत्रीचे संबंध आहे. त्याचा प्रभाव विद्या बालनच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वावर दिसून येतो. बृहस्पती स्वयंम् सप्तम स्थानात असून लग्नला दृष्टि प्रदान करत आहे. लग्नात सूर्य-शुक्र विद्यमान आहेत. याच योगाने विद्याच्या अभिनयात ग्लॅमर कमी व भावूकता अधिक दिसून येते. भावुकतेमुळे तीला परीस्थितीवर नियंत्रण ठेवणे तिला फार कठीण जात असते. राहु-केतु चांगल्या स्थितीत असून दशम-चतुर्थ आहे. तो प्रेमास प्रेरक आहे. विवाह योग सध्या तरी नाही.एकूणात विद्यासाठी नववर्ष लाभदायी ठरणार आहे. 'पा' ची यशस्वीता भविष्यातील अडचणी दूर करण्यास फायदेशिर ठरणार आहे. चित्रपटासह जाहिराती व परदेश भ्रमणाचे योग आहेत.