सलमानच्या विवाहास 'गुरू' अडसर
- भारती पंडित
बॉलीवूडमधील टॉपचा स्टार सलमान खान हा त्याच्या विवाहावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. कधी भांडण तर कधी ऐश्वर्या व कटरीना या स्टार अभिनेत्रीशी जुन्या प्रेमसंबंधावरून तर कधी निवडणुकीचा प्रचार, या ना त्या कारणामुळे तो 2009 वर्षात जरा जास्तच चर्चेत राहीला होता. सलमानची सूर्य कुंडली पाहिली असता त्याच्या कुंडलीतील सप्तम स्थानातील गुरू त्याच्या विवाहास अडसर ठरत आहे. सूर्य कुंडलीनुसार 27 डिसेंबर 1965 रोजी इंदूर येथे सलमानचा धनु लग्नानात जन्म झाला होता. लग्नेश गुरु सप्तम स्थानात ठान मांडून बसला असून सलमानला चुंबकीय व्यक्तिमत्त्व व शरीर सौष्ठव प्रदान करण्यास सहाय्यक ठरला आहे. हाच गुरु त्याला अहंकारी व महत्त्वाकांक्षी ही बनवत आहे. वाणी भावात मंगळ उच्च असून शुक्र- चंद्राची युती असल्याने कला क्षेत्रात त्याची अधिक आवड वाढवत असून त्याचा उत्सह वाढवत आहे. शनि त्याचे भाग्य चमकवत असून पराक्रमी करत आहे. राहु, प्रबळ असून शत्रुहंत योगमध्ये आहे. बुध- केतु यांची युती त्याला नेहमी वादविवादांमध्ये अडकवते. मात्र त्याच्या हातून धार्मिक कार्य ही करून घेत असते. सप्तमातील गुरु व लग्नातील सूर्य सलमानच्या विवाहात अडसर बनत आहे.सध्या सलमान द्वितीयेश व तृतीयेश शनिच्या महादशेतून वाटचाल करीत आहे. बुधचे अंतर एप्रिल 2010 पर्यंत आहे. त्यानंतर जून 2011 पर्यंत केतुचे अंतर आहे. हा काळ सलमानसाठी कुटुंब, धन व भाग्य वृध्दीसाठी उत्तम आहे. मात्र विरोधकांचा त्याला अंदज घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. सलमानचे फिल्मी करियर स्थिर राहील. एप्रिल 2010 ते जून 2011 या दरम्यान त्याचे कुणावर प्रेम बसून त्याला विवाह रूप देण्यासंदर्भात विचार होण्याचा संभव आहे. मात्र या काळात विवाह योग नाही. सलमानला निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी लागणार असून जीभेवरही ताबा ठेवावा लागेल.