शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (13:48 IST)

घरात बनवा होममेड मेकअप रिमूव्हर

एखाद्या ऑफिस, पार्टी किंवा समारंभातून आल्यावर जेवढे महत्त्वाचे असते कपडे बदलणे, तेवढेच महत्त्वाचे असते. मेकअप काढणे आम्ही आज सांगत आहोत घरी मेकअप रिमूव्हर बनवणे. याचा वापर करून आपण आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक देऊ शकता. 
 
घरात बनवा होममेड मेकअप रिमूव्हर -
1 बदामाचं तेल आणि कच्चं दूध - 
कच्चं दूध त्वचेसाठी खूप चांगले आहे एक चमचा कच्च्या दुधात बदामाच्या तेलाच्या काही थेंबा टाकून चेहऱ्यावर लावा आणि हळुवार हाताने मेकअप सोडवा.
 
2 ऑलिव्ह तेल -
ऑलिव्ह तेल हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याने चेहऱ्याची मॉलिश केल्याने चेहऱ्याची रंगत वाढते. तसेच आपण ह्याला मेकअप काढण्यासाठी देखील वापरू शकता. यासाठी दोन चमचे तेलामध्ये अर्धा चमचा पाणी मिसळून लावा. मेकअप काढल्यावर हळुवार मॉलिश करा मेकअप काढण्यासह हे त्वचेला देखील मॉइश्चराइझ करतो.
 
3 काकडी -
काकडीचा वापर आपण मेकअप रिमूव्हर साठी देखील करू शकता. या साठी सर्वप्रथम काकडीला मिक्सर मध्ये वाटून पातळ पेस्ट बनवा, नंतर ह्याला सरळ चेहऱ्यावर लावून मॉलिश करा. मेकअप रिमूव्ह करण्यासह हे त्वचेला मऊ बनवतं आणि डाग देखील दूर करतं.
 
4 दही -
दररोज दही खाल्ल्यानं आणि चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा चमकते, पण आपल्याला माहीत आहे का की हे आपण मेकअप काढून टाकण्यासाठी देखील वापरू शकता. दही एक उत्तम मेकअप रिमूव्हर आहे. यासाठी सर्वप्रथम दह्याला फेणून घ्या. या मध्ये कॉटन बॉल बुडवून चेहऱ्यावर हळुवार हाताने लावा.जेव्हा पूर्ण मेकअप निघेल तेव्हा चेहरा पाण्याने धुऊन टाका.
 
5 बेबी शँम्पू- 
बेबी शॅम्पू एक उत्तम मेकअप रिमूव्हर आहे. या साठी एक कप पाण्यात आठ चमचे ऑलिव्ह तेल /खोबरेल तेल आणि अर्धा चमचा बेबी शॅम्पू मिसळून एका बाटलीत भरून ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरा.
 
6 नारळाचं तेल - 
नारळाचं तेल चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. मॉइश्चरायझर, लिपबाम आणि मेकअप रिमूव्हर म्हणून आपण ह्याला वापरू शकता. तळहातावर थोडंसं नारळाचं तेल घेऊन हे चेहऱ्यावर लावा आणि हळुवार हाताने मॉलिश करून टिशू पेपर ने स्वच्छ करा आणि चेहरा धुऊन घ्या.नंतर थोडं तेल घेऊन डोळ्यांना लावा आणि हळुवार हाताने मॉलिश करा.
 
7 जोजोबा आणि व्हिटॅमिन ई तेल -
अँटी ऑक्सीडेंट च्या गुणधर्माने समृद्ध व्हिटॅमिन ई त्वचेला मऊ बनवतं. 60 मिली जोजोबा तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून काचेच्या बाटलीत ठेवा आणि आवश्यकतानुसार वापरा. याने आपण सहजपणे वॉटर प्रूफ, मस्कारा,लिक्विड आई लायनर देखील रिमूव्ह करू शकता, तेही जास्त प्रयत्न न करता.