शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

कालरात्रीच्या कृपेने होते अपत्यप्राप्ती

WDWD
आयु्ष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण कोणता असे कोणत्याही महिलेला विचारले तर स्वतःला झालेले मूल असे उत्तर हमखास येईल. कारण मूल होणे ही घटनाच तशी आहे. लहान मुलाचे बोबडे बोल ऐकून मनुष्य जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. त्याच्याशी खेळण्या-बागडण्यात वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.

सर्व दुःखेसुद्धा या सुखापुढे खुजी ठरतात. म्हणूनच कदाचित 'अपत्यसुख' असा शब्द वापरत असावेत. अपत्य होणे ही घटना किती महत्त्वाची असते, ते ज्यांना वर्षानुवर्षे मूल होत नाही त्यांना विचारल्यास कळेल. खरे तर, त्यांचे दुःख व्यक्त करायला शब्दही पुरे पडणार नाहीत.

म्हणूनच हे अपत्यसुख मिळविण्यासाठी महिला काहीही करतात. परमेश्वराच्या पायावर डोके टेकविण्यापासून डॉक्टरच्या पायऱया चढेपर्यंत जे जे सुचतील आणि सुचविले जातील, ते ते उपाय केले जातात. श्रद्धा अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला इंदूरमधील कालरात्री मंदिरात घेऊन जाणार आहोत. या मंदिरातील अंबावली माता म्हणे ज्यांना मूल हवे असेल त्यांची इच्छा पूर्ण करते.

त्यामळे तिच्याकडे नवस मागण्यासाठी अनेक लोक येत असतात. अनेकांच्या घरात तिच्यामुळेच बोबडे बोल ऐकू येऊ लागल्याची अनेकांची श्रद्धा आहे.

कालरात्री माता या नावानेही संबोधल्य
WDWD
जाणाऱ्या या देवीच्या मंदिरात मंगळवारी रात्री अपत्यप्राप्तीसाठी विशेष पूजा होते. ही माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री या देवळात गेले. त्यावेळी भक्तांची ही गर्दी उसळलेली. यावेळी अनेकांची गाठभेट झाली. त्यांच्यापैकी अनेकजण नवसासाठी आले होते, तर काही जण नवसपूर्तीसाठी. नवस फेडण्यासाठी आलेल्यांनी देवीच्या पायावर घालण्यासाठी त्यांचे मूलही आणले होते.


WDWD
संजय आंबरीया या एका दाम्पत्याशी बोलले. वेबदुनियाशी बोलताना त्यांनी सगळी कहाणी सांगितली. लग्नानंतर दहा वर्षांपर्यंत त्यांना मूल होत नव्हते. मुंबईत रहाणाऱ्या एका मित्राने त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर हे दाम्पत्य येथे आले आणि त्यांनी देवीलाच गाऱ्हाणे घातले. नवस ठेवल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या पत्नीला दिवस गेले. आणि आता लहानग्यासह हे दाम्पत्य देवीच्या दर्शनासाठी आले होते.

येथे नवस करण्याची पद्धतही वेगळी आहे. सुरवातीला भाविक देवीला तीन नारळ वाहून मूल होण्यासाठी याचना करतो. त्यानंतर मंदिराचा पुजारी त्याला एक धागा देतो. तो गळ्यात बांधायचा असतो. हा धागा पाच आठवड्यांपर्यंत ठेवावा लागतो.

या काळात त्याची इच्छा पूर्ण झाल्यास नियमानुसार त्यालापाच नारळांचे तोरण येथील झाडावर बांधावे लागते. संजय आबरीया त्यासाठीच येथे आले होते. आंबरीयांसारखे अनेक जण येथे तेच करण्यासाठी येथे आले होते. भाविकांशी बोलत असतानाच मंदिराचे पूजारी पूरणसिंह परमार आले. त्यांनी सांगितले, की हे मंदिर कालरात्री मातेचे मंदिर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच येथे रात्री पूजा होते. येथे अगदी कळकळीने मागितलेले मागणे नक्कीच पूर्ण होते, असा त्यांचा दावा आहे. बोलता बोलता आरतीची वेळ झाली. परमार आरतीला घेऊन गेले.

आरतीच्या वेळी त्यांनी हातात बांधायच्या पवित्र धाग्याची पूजा केली. हा धागा भाविकांच्या गळ्यात पाच आठवड्यांपर्यंत ठेवावा लागेल, असे त्यांनी सांगितले. आरती सुरू असतानाच काही लोकांच्या अंगात आले. वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. आरतीनंतर पुजाऱ्याने तेथे आलेल्या महिलांची ओटी भरायला सुरवात केली. या महिलांच्या ओटीत नारळ वाहण्यात आला. आपली ओटी यामुळे नक्की भरली जाईल, असा विश्वास या महिलांमध्ये दिसला.

अपत्यप्राप्तीच्या आशेने येथे आलेल्या विमल
WDWD
सेंगर यांचा या देवीवर विश्वास आहे. तिच्या कृपेने नक्कीच आपल्या घरात लहान मूल येईल, असे त्यांना वाटते. विशेष म्हणजे या देवीच्या आशीर्वादाने मुलगी झाली तर तिला दुर्गादेवीचा अंश मानतात. म्हणूनच की काय अनेक दाम्पत्य मुलापेक्षा मुलीच्या आशेने येथे येतात. येथे आलेल्या दाम्पत्याच्या मते येथे येणाऱ्या भाविकांची केवळ मनातली इच्छाच पूर्ण होते, असे नाही तर त्याला जे पाहिजे ते मिळते. याविषयी तुम्हाला काय वाटते, ते आम्हाला जरूर कळवा.